२०२० पासून जगातील पाच सर्वात श्रीमंत लोकांची एकूण संपत्ती दुपटीने वाढली आहे. एका दशकात जगाला पहिले ट्रिलियनियर मिळू शकतात, तर गरिबी दूर करण्यासाठी दोन शतकांपेक्षा जास्त वेळ लागणार आहे. या तीन गोष्टींचा विचार केल्यास जगात आर्थिक विषमता किती वाढली आहे हे लक्षात येईल. जगातील गरीब अधिक गरीब होत चालले आहेत आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. ऑक्सफॅमच्या ताज्या अहवालात असेच काही धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेक कंपन्यांचे सीईओ बनले अब्जाधीश

सोमवारी येथे जागतिक आर्थिक मंच (WEF) च्या वार्षिक बैठकीच्या पहिल्या दिवशी वार्षिक असमानता अहवाल जारी केला. ऑक्सफॅमने सांगितले की, जगातील १० सर्वात मोठ्या समूहांपैकी ७ समूहांचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा प्रमुख भागधारक अब्जाधीश आहेत. १४८ महत्त्वाच्या समूहांनी १८०० अब्ज डॉलरचा नफा कमावला आहे, जो तीन वर्षांच्या सरासरीपेक्षा ५२ टक्के अधिक आहे. श्रीमंत भागधारकांना प्रचंड फायदा मिळाला आहे, तर लाखो लोकांना रिअल टाइम वेतन कपातीचा सामना करावा लागला आहे. NGO Oxfam ने सार्वजनिक कारवाईच्या नव्या युगाचं आवाहन केलंय, त्यात सेवांचा विस्तार, कॉर्पोरेट नियमन, मक्तेदारी मोडीत काढणे आणि कायमस्वरूपी संपत्ती आणि प्रवेश नफा कर लागू करणे याचा समावेश आहे.

हेही वाचाः Employee Layoff : महिला कर्मचाऱ्याने बनवला नोकरीवरून काढल्यानंतर व्हिडीओ, कंपनीचे सीईओही पाहून झाले भावूक

२२९ वर्षे गरिबी संपणार नाही

ऑक्सफॅमच्या असमानता आणि जागतिक कॉर्पोरेट पॉवर्सवरील अहवालात म्हटले आहे की, जगातील पाच सर्वात श्रीमंत लोकांची संपत्ती २०२० पासून ४०५ अब्ज डॉलरवरून ८६९ अब्ज डॉलरपर्यंत दुप्पट झाली आहे. तर सुमारे पाच अब्ज लोक आधीच गरीब झाले आहेत. रिपोर्टनुसार, जर सध्याचा ट्रेंड असाच चालू राहिला तर एका दशकात जगाला पहिले ट्रिलियनियर मिळतील, परंतु पुढील २२९ वर्षे गरिबी संपणार नाही.

हेही वाचाः शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांक, सेन्सेक्स पहिल्यांदाच ७३ हजारांच्या पार, निफ्टीने २२ हजारांचा स्तर ओलांडला

श्रीमंत देशांकडे जास्त संपत्ती

ऑक्सफॅम इंटरनॅशनलचे अंतरिम कार्यकारी संचालक अमिताभ बेहार म्हणाले की, विषमतेची ही परिस्थिती अपघाताने उद्भवलेली नाही. अब्जाधीश वर्ग हे सुनिश्चित करत आहे की, कॉर्पोरेशन त्यांना इतर सर्वांच्या खर्चावर अधिक संपत्ती प्रदान करेल. ऑक्सफॅमच्या मते, जागतिक लोकसंख्येच्या केवळ २१ टक्केच प्रतिनिधित्व करत असले तरी ग्लोबल नॉर्थच्या श्रीमंत देशांमध्ये ६९ टक्के जागतिक संपत्ती आहे आणि जगातील ७४ टक्के अब्जाधीश त्यांच्याकडे आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The wealth of the world 5 billionaires doubled while poverty increased shocking revelations from the report vrd