मुंबई: देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारासाठी उच्च-गुणवत्तेच्या द्विस्तरीय पुठ्ठ्यांच्या निर्मितीतील थ्री एम पेपर बोईस लिमिटेडने ‘बीएसई एसएमई’ बाजारमंचावर सूचिबद्धतेसाठी प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) प्रस्तावित केली आहे. शुक्रवार १२ जुलै ते १६ जुलै दरम्यान खुल्या राहणाऱ्या या आयपीओद्वारे कंपनीची ३९.८३ कोटी रुपये निधी उभारण्याची योजना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Gold-Silver Price: सोन्याच्या घसरणीला ब्रेक, गेल्या २४ तासांत ‘एवढा’ वाढला भाव, मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमची किंमत पाहा

कंपनीच्या समभागांसाठी प्रत्येकी ६७ ते ६९ रुपयांदरम्यान गुंतवणूकदारांना बोली लावता येईल. वैयक्तिक गुंतवणूकदारांना किमान २,००० समभागांसाठी अर्थात १.३८ लाख रुपयांच्या गुंतवणूक मूल्यासह अर्ज दाखल करावा लागेल. समभाग विक्रीतून उभारला जाणारा निधी उत्पादन प्रकल्प इमारतीचा विस्तार, यंत्र खरेदी, कर्जाची आंशिक परतफेड आणि खेळते भांडवल म्हणून कंपनीकडून केला जाईल. कम्फर्ट सिक्युरिटीज लि. ही या आयपीओ प्रक्रियेचे व्यवस्थापन पाहात आहे. कंपनीकडून प्लास्टिक फायर्ड लो-प्रेशर बॉयलरच्या खरेदीसाठी १४ कोटी रुपयांचा भांडवली खर्च केला जाणार आहे. प्रकल्पातील टाकाऊ कचरा आणि प्लास्टिकचा वापर करून यातून वीज निर्मिती केली जाईल. ज्यातून कंपनीच्या विजेवरील खर्च लक्षणीयरीत्या कपात अपेक्षित आहे. १० कोटी रुपये खेळत्या भांडवलाची गरज म्हणून वापरात येतील आणि ७ कोटी रुपयांचा वापर मुदत कर्जाच्या परतफेडीसाठी केला जाईल. कर्जफेडीमुळे कंपनीकडील रोख प्रवाह सुधारेल आणि व्याज खर्चातही बचत होईल.