Mera Bill Mera Adhikar : केंद्र सरकारने किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांमध्ये जीएसटी बिलाची देवाणघेवाण वाढवण्यासाठी ‘मेरा बिल मेरा अधिकार’ योजना (Mera Bill Mera Adhikar) सुरू केली आहे. गुरुवारी या योजनेची घोषणा करताना केंद्र सरकारने सांगितले की, या माध्यमातून प्रत्येक तिमाहीत १-१ कोटींची दोन बंपर बक्षिसे दिली जाणार आहे. तसेच १० हजार ते १० लाख रुपयांपर्यंतची अनेक बक्षिसेही सहभागींना मिळणार आहेत. ही योजना १ सप्टेंबर २०२३ पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१० हजार ते १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे उपलब्ध होणार

या विशेष योजनेची माहिती देताना अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, वस्तू आणि सेवा कर (GST) बिल दरमहा अपलोड करणाऱ्यांपैकी ८०० लोकांना १०,००० रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. असे १० भाग्यवान लोक असतील, ज्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. दुसरीकडे बंपर बक्षीसाबद्दल बोलायचे झाल्यास ते तिमाही आधारावर काढले जाणार आहे. या बंपर रिवॉर्डचा लाभ तिमाहीत अपलोड केलेल्या कोणत्याही बिलाच्या सहभागी व्यक्तीला दिला जाऊ शकतो.

‘या’ योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार

‘मेरा बिल मेरा अधिकार’ योजना खास ग्राहकांना GST बिले किंवा इनव्हॉइस गोळा करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. अधिकाधिक जीएसटी इनव्हॉइस तयार झाल्यास व्यावसायिक कर चुकवू शकणार नाहीत. त्यामुळे सरकारच्या महसुलातही वाढ होणार आहे. ही योजना आसाम, गुजरात, हरियाणा आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी, दादरा नगर हवेली आणि दमण-दीवसाठी सुरू करण्यात आली आहे. ‘मेरा बिल मेरा अधिकार’ योजनेचा लाभ घेण्यासाठी अपलोड केलेल्या इनव्हॉइसमध्ये जीएसटीआयएन (GSTIN) इनव्हॉइस क्रमांक, भरलेली रक्कम, कराची रक्कम, इनव्हॉइसची तारीख आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे नाव प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

हेही वाचाः २०० रुपये किलो टोमॅटोसाठी तयार व्हावं लागणार! या आठवड्यातील बाजारातील आकडेवारी पाहा

बिल कसे अपलोड करायचे?

यासाठी तुम्ही iOS आणि Android वरून ‘My Bill My Rights’ अॅप डाऊनलोड करा.
याशिवाय तुम्ही web.merabill.gst.gov.in वर देखील भेट देऊ शकता.
किमान २०० रुपयांचे बिल येथे अपलोड केले जाऊ शकते.
वापरकर्ता एका महिन्यात जास्तीत जास्त २५ बिले अपलोड करू शकतो.

हेही वाचाः चांद्रयान ३ ने चंद्रावर तिरंगा फडकावला अन् दुसरीकडे ‘या’ १३ कंपन्यांनी २० हजार कोटींची केली कमाई

विजेत्यांना ही कागदपत्रे दाखवावी लागणार

अर्थ मंत्रालयाने माहिती दिली आहे की, ज्या विजेत्यांना पारितोषिक मिळेल त्यांना पॅन नंबर, आधार कार्ड, बँक खात्याचे तपशील ‘मेरा बिल मेरा अधिकार’ अॅपवर अपलोड करावे लागतील. ही सर्व माहिती बक्षीस जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत देणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Through mera bill mera adhikar you can win prizes up to 1 crore know the complete procedure vrd
Show comments