नवी दिल्ली : प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत नजीक येऊन ठेपल्याने विवरणपत्र दाखल करणाऱ्या करदात्यांच्या संख्येत वाढ होत आहे. प्राप्तिकर विभागाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलैपर्यंत २ कोटींहून अधिक करदात्यांनी विवरणपत्र दाखल केली आहेत. पगारदार करदात्यांना आणि ज्यांना त्यांच्या खात्यांचे लेखापरीक्षण करणे आवश्यक नाही अशा करदात्यांसाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षात कमावलेल्या उत्पन्नासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे.

दोन कोटी प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्याचा टप्पा मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ९ दिवस आधीच गाठला गेला आहे. गेल्या वर्षी २० जुलैपर्यंत २ कोटी करदात्यांनी विवरणपत्र दाखल केले होते, त्या तुलनेत यावर्षी ११ जुलैलाच हा टप्पा गाठला गेला.

Action will be taken against employees who refuse election work
निवडणूकीचे काम नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
Excessive expenditure on ST Bank employees But members of bank still did not get dividend
एसटी बँकेच्या कर्मचाऱ्यांवर लाखोंची खैरात, सभासदांना ठेंगा; कर्मचारी संघटना म्हणते…

मुदतीत विवरणपत्र भरण्याचे आवाहन

अंतिम मुदत जवळ आल्याने विवरणपत्रे भरण्यासाठी संकेतस्थळावर होणाऱ्या गर्दीमुळे करदात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. म्हणूनच शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी करदात्यांनी लवकर विवरणपत्र दाखल करण्याचे आवाहन प्राप्तिकर विभागाने केले आहे.