मुंबई: नागरी सहकारी बँकांतील अग्रणी टीजेएसबी सहकारी बँकेने नुकत्याच झालेल्या २० व्या वार्षिक बँकिंग तंत्रज्ञान परिषद आणि पुरस्कार सोहळ्यात चार प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले. देशातील बँकिंग उद्योगाचा महासंघ असलेल्या ‘इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए)’ने तंत्रज्ञानाधारित ग्राहक सेवेची नोंद टीजेएसबीला सन्मानित केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीजेएसबी सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट डिजिटल सेल्स, पेमेंट्स व एंगेजमेंट (विजेते), सर्वोत्कृष्ट टेक टॅलेंट व ऑर्गनायझेशन (विजेते), सर्वोत्कृष्ट आयटी रिस्क मॅनेजमेंट (विशेष उल्लेख), सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान बँक (विशेष उल्लेख) असे चार पुरस्कार ‘आयबीए’ने दिले आहेत. टीजेएसबीचे उपाध्यक्ष वैभव सिंघवी यांनी हे पुरस्कार रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी. रबी शंकर, ‘आयबीए’चे अध्यक्ष एम. व्ही.राव, आयआयटी मुंबई येथील प्राध्यापक दीपक पाठक यांच्या हस्ते स्वीकारले. यावेळी बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

टीजेएसबी सहकारी बँकेने तिच्या कार्यपद्धतीतून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्राहक सेवा आणि डिजिटल बँकिंगच्या क्षेत्रात नवे मानदंड स्थापित केले आहेत. या पुरस्कारांनी बँकेची विश्वासार्हता अधोरेखित झाली आहे. नव्या तंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त उपयोग करून ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी बँक कटिबद्ध आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tjsb wins four awards for technology enabled customer service print eco news amy