गेल्या काही दिवसांपासून दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडिया लिमिटेड (Vi) च्या अडचणी काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. या अडचणींना तोंड देण्यासाठी Vodafone-Idea ने व्यवसाय पुनरुज्जीवित करण्याच्या योजनेचा भाग म्हणून एकूण १४,००० कोटी रुपयांची इक्विटी गुंतवण्याचा प्रस्ताव दिला आहे. १४००० कोटींच्या निधीतून व्होडाफोन आणि आयडिया कंपनी संकटातून बाहेर येऊ शकते, असा त्यांना विश्वास आहे. विद्यमान प्रवर्तक आदित्य बिर्ला ग्रुप (ABG) आणि UK चे Vodafone Group Plc आपल्या एकूण रकमेपैकी निम्मी रक्कम त्यासाठी देणार आहेत. योजनेनुसार, एबीजी आणि व्होडाफोन समूह लवकरच कंपनीमध्ये नवीन इक्विटी म्हणून २००० कोटी गुंतवतील. सप्टेंबर २०२१ मध्ये सरकारच्या टेलिकॉम रिस्टोरेशन पॅकेजपूर्वीच प्रवर्तकांनी ५००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
बँकेचे कर्ज कमी होणार
व्होडाफोन-आयडियामध्ये जवळपास १८ टक्के भागभांडवल असलेली ABG ही प्रवर्तक इक्विटीच्या रूपात गुंतवणूक करण्यासाठी नवीन निधी उभारण्यासाठी परदेशी कर्जदारांशी चर्चा करीत होती. ABG ने सुमारे २५० दशलक्ष डॉलरसाठी परदेशी कर्जदारांशी करार केला आहे, परंतु व्होडाफोन समूहदेखील निधीच्या देवाणघेवाणीत सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे बँकेकडे असलेलं कर्ज कमी होणार आहे.
हेही वाचाः टाटा समूहाने वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला; १६ ते ६२% पर्यंत फायदा
निधी उभारण्यास तीन गुंतवणूकदारांशी आगाऊ चर्चा सुरू
Vodafone Idea चे CEO अक्षय मुंद्रा यांनी चौथ्या तिमाहीनंतर सांगितले होते की, कर्जात बुडलेल्या कंपनीसाठी इक्विटी इन्फ्युजनद्वारे वित्त उभारण्यास तीन गुंतवणूकदारांशी आगाऊ चर्चा सुरू आहे. फेब्रुवारीमध्ये केंद्राने प्रवर्तकांकडून आश्वासने आणि इक्विटी इन्फ्युजननंतर व्होडाफोन आयडियाच्या थकबाकी असलेल्या १६,१३३ कोटींचे स्टॉकमध्ये रूपांतर करण्यास मान्यता दिली. Vi ने वचनबद्ध ताज्या इक्विटीच्या बदल्यात घरगुती कर्जदारांकडून २५,००० कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज घेण्याची मागणी केली आहे.
रोख टंचाईचा सामना करावा लागू शकतो
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, Vi ने आपले बँक कर्ज ४०,००० कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावरून सध्या सुमारे १२,००० कोटी रुपयांपर्यंत कमी केले आहे आणि कंपनीने कर्जदारांना प्रवर्तकांकडून आधीच झालेल्या इक्विटी इन्फ्युजनच्या अनुषंगाने निधी जारी करण्यास सांगितले आहे. तज्ज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडियाला आर्थिक वर्ष २०१६ मध्ये २५,००० कोटी रुपयांच्या रोख तुटवड्याचा सामना करावा लागू शकतो आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी सध्याच्या दरांमध्ये मोठी वाढ करणे आवश्यक आहे. Vi ने फेब्रुवारीमध्ये १.३ दशलक्ष 4G ग्राहक गमावले, जी तोट्यात असलेल्या कंपनीसाठी २१ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी 4G पायाभूत सुविधांमध्ये तातडीने गुंतवणूक करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या संकटावर मात करण्यास मदत होणार आहे.