Today’s Gold Silver Price : सोन्या- चांदीच्या दरात सातत्याने मोठे बदल होताना दिसत आहेत. यात सतत वाढत्या दरामुळे सोन्या-चांदीची खरेदी करावी की नाही असा प्रश्न खरेदीदारांच्या मनात निर्माण होत आहे. यात आज १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सोन्या- चांदीच्या दरात किंचितशी घसरण झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा दर ८६,१८० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे, आज सकाळी १०.३० वाजेपर्यंच सोन्याच्या दरात १३०रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीचा दर ३२० रुपयांनी कमी झाला आहे. देशात आजच्या घडीला चांदीचा दर ९७,०२० रुपये झाली आहे, पण आज तुमच्या शहरात सोन्या-चांदीचा दर नेमका काय आहे जाणून घेऊ…
देशात आज सोन्या-चांदीचा दर नेमका काय आहे? (Gold-Silver Price On 19 February 2025)
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर ८६,१८० रुपये आहे, तर २२ कॅरेटचे दर ७८,९९८ रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचे दर ९७० रुपये आहे तर १ किलो चांदी ९७,०२० रुपयांनी विकली जात आहे. त्यामुळे आज गेल्या आदल्या दिवशीच्या तुलनेत सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्येही सोन्या- चांदीच्या दरात चढ-उतार झाले आहेत.
आदल्या दिवशीचा म्हणजे १८ फेब्रुवारी २०२५ रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ८३,३१० रुपये होता, तर १ किलो चांदीचा दर ९७, ३४० रुपये होता. यावरुन तुमच्या लक्षात येईल की, आज सोन्याचे दर कालच्या तुलनेत आज १३० रुपयांनी तर चांदी ३२० रुपयांनी वाढले आहेत.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार जाणून घेऊया तुमच्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर
शहर | २२ कॅरेट सोन्याचा दर | २४ कॅरेट सोन्याचा दर |
मुंबई | २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७८,७५१ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याची किंमत ८५,९१० प्रति १० ग्रॅम आहे. |
पुणे | २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७८,७५१ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ८५,९१० रुपये आहे. |
नागपूर | २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७८,७५१ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ८५,९१० रुपये आहे. |
नाशिक | २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७८,७५१ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ८५,९१० रुपये आहे. |
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.
सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?
हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे.१ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.