Gold Silver Rate Today 9 December 2024 : गेल्या आठवड्याभरात सोन्या- चांदीचे दर काही प्रमाणात स्थिर असल्याचे दिसून आले. आठवड्याभरापूर्वी २४ कॅरेट सोन्याचा दर ७६ हजार ६८० रुपये होता, तोच दर आज (सोमवार) ७६ हजार ७३० रुपये झाला आहे. त्यामुळे आठवड्याभरात सोन्याचा दर फक्त ५० रुपयांनी लाढला आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. आज २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर ७६, ८३० रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ९२,०९० रुपये आहे, आज ८ डिसेंबरच्या तुलनेत सोन्याचा दर स्थिर आहे, तर चांदीच्या दरात २५० रुपयांनी घट झाली आहे. पण ९ डिसेंबरला मुंबई, पुण्यासह तुमच्या शहरात सोन्या-चांदीचे दर काय आहेत जाणून घेऊ…
देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 9th December 2024)
इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, सोमवारी, ९ डिसेंबरला सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. सकाळी ११ वाजता २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,७३० रुपये नोंदवला होता, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,३३६ रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवला गेला. आठवड्याभरापूर्वी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ५० रुपयांनी स्वस्त झालं आहे.
दरम्यान चांदीच्या दरातही आज २५० रुपयांची घट झाली आहे. आज १ किलो चांदीचा दर ९२,०९० रुपये नोंदवला गेला आहे. दरम्यान आठवड्याभरापूर्वी १ किलो चांदीचा दर जवळपास ९०,६५० रुपये होता.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर (Gold Silver Rate Today 9th December 2024)
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
शहर | २२ कॅरेट सोन्याचा दर | २४ कॅरेट सोन्याचा दर |
मुंबई | २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७०,२१७ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याची किंमत ७६,६०० प्रति १० ग्रॅम आहे. |
पुणे | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,२४४ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,६३० रुपये इतका आहे. |
नागपूर | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,७१७ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,६०० रुपये इतका आहे. |
नाशिक | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,२१७ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,६०० रुपये इतका आहे. |
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)