Gold Silver Rate Today 18 December 2024 : सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणाक होत आहे. वाढत्या मागणीमुळे सोन्याचे दर सातत्याने वाढतच आहे, ही दर वाढ जास्त नसली तरी आत्ताचे दर पाहता, सोनं खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. आज सोन्याचा दर ४० रुपयांची वाढ झाली आहे, पण चांदीच्या दरात मात्र १०० रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार असाल तर आजचे नेमके दर काय आहेत जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, आज १८ डिसेंबर २०२४ रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर ७७,०३० रुपये प्रति १० ग्रॅम आहे, म्हणजे १७ डिसेंबरच्या तुलनेत सोन्याच्या ४० रुपयांची वाढ झाली आहे, त्यामुळे सोन्याच्या दरात कमी अधिक प्रमाणात का होईन वाढ झाल्याचे दिसून येते. मात्र चांदीच्या दरात मात्र घसरण झाली आहे. आज १ किलो चांदीचा दर ९०,६६० रुपये आहे, पण १७ डिसेंबरच्या तुलनेत हे दर ११० रुपयांनी कमी झाले आहेत.

देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 18 December 2024)

इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, मंगळवार १८ डिसेंबरला सकाळी ११ वाजता २४ कॅरेट सोन्याचा दर ७७,०३० रुपये नोंदवला होता, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,६११ रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवला गेला. आठवड्याभरापूर्वी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ७९ हजार रुपये इतका होता.

दरम्यान चांदीच्या दरात घट झाली आहे. आज १ किलो चांदीचा दर ९०,६६० रुपये नोंदवला गेला आहे. दरम्यान आठवड्याभरापूर्वी १ किलो चांदीचा दर जवळपास ९५,७६० रुपये होता. सोन्या-चांदीच्या दरात सतत होणारे चढ -उतार पाहता ग्राहक चिंता व्यक्त करत आहेत.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७०,४५५ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७६,८६० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,४५५ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७६,८६० रुपये इतका आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,४५५ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७६,८६० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,४५५ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७६,८६० रुपये इतका आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today gold silver rate 0n 18 december 2024 gold silver price hike check latest price in mumbai nashik pune nagpur delhi jaipur sjr