Gold Silver Rate Today 11 january 2025 : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनचं सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ सुरु आहे.जानेवारी २०२५ च्या दुसऱ्या आठवड्यातही दरवाढ काही थांबण्याचे नाव घेत नाही, ज्यामुळे २४ कॅरेट सोन्याचा दर आता पुन्हा ८० हजारांच्या दिशेने वाटचाल करत आहे. आठवड्याभरात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ७७ हजारांवरून आता ७८ हजारांवर जाऊन पोहोचला आहे. तर १ किलो चांदीच्या दराने ८९ हजारांवरुन ९२ हजारांवर उडी घेतली आहे. पण आज शनिवार ११ जानेवारी २०२५ रोजी तुमच्या शहरात २२ आणि २४ कॅरेट सोन्याचा दर नेमका किती आहे जाणून घेऊ…
देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 11 january 2025)
इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, आज ११ जानेवारी २०२५ रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर ७८,६९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,१३३ रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवला गेला.
तसेच १ किलो चांदीचा दर ९२,६०० रुपये आहे. पण चांदीच्या दरात सतत वाढ होताना दिसतेय. वर्ष २०२४ मध्ये ७२ हजार रुपयांवर असलेली चांदी आज ९२ हजारांवर येऊन पोहचली आहे. तर सोन्याचा दर ६२ हजारांवरुन आज ७८ हजारांवर पोहोचला आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात सतत होणारे चढ -उतार पाहता ग्राहक चिंता व्यक्त करत आहेत.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
शहर | २२ कॅरेट सोन्याचा दर | २४ कॅरेट सोन्याचा दर |
मुंबई | २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७२,००४ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याची किंमत ७८,५५० प्रति १० ग्रॅम आहे. |
पुणे | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,००४ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७८,५५० रुपये इतका आहे. |
नागपूर | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,००४ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७८,५५० रुपये इतका आहे. |
नाशिक | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,००४ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७८,५५० रुपये इतका आहे. |
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)