Gold Silver Rate Today 15 December 2024 : सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत, यात सोन्या-चांदीच्या दरात सतत चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आठवड्याभरात सोन्याचा दरात जवळपास ५२० रुपयांची वाढ झाली आहे. आज १५ डिसेंबर २०२४ रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर ७७,२५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला, गेल्या आठवड्याच्या शेवटी हाच दर ७६,७३० रुपये प्रति १० ग्रॅम होता, त्यामुळे सोन्याच्या दरात कमी अधिक प्रमाणात का होईन वाढ झाल्याचे दिसून येते. मात्र चांदीच्या दरात मात्र मोठी घसरण झाली आहे, आज १ किलो चांदीचा दर ९०,९४० रुपये आहे, हाच दर आठवड्याभरापूर्वी ९२,३४० रुपये होता. त्यामुळे आठवड्याभरात सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. पण आज १५ डिसेंबरला मुंबई, पुण्यासह तुमच्या शहरात सोन्या-चांदीचे दर काय आहेत जाणून घेऊ…

देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 15 December 2024)

इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, रविवारी, १५ डिसेंबरला सकाळी ११ वाजता २४ कॅरेट सोन्याचा दर ७७,२५० रुपये नोंदवला होता, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,८१३ रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवला गेला. आठवड्याभरापूर्वी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ७६ हजार रुपये इतका होता.

Shocking video found plastic in ginger garlic paste unhygienic shocking video goes viral
गृहिणींनो तुम्हीही विकतची आलं-लसूण पेस्ट वापरता? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Shiv sena bharat Gogawale
Maharashtra Cabinet Expansion: शिंदे गटातील कोणत्या आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेले? आमदार भरत गोगावलेंनी सांगितली नावे
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर

दरम्यान चांदीच्या दरात घट झाली आहे. आज १ किलो चांदीचा दर ९०,९४० रुपये नोंदवला गेला आहे. दरम्यान आठवड्याभरापूर्वी १ किलो चांदीचा दर जवळपास ९२,३४० रुपये होता. सोन्या-चांदीच्या दरात सतत होणारे चढ -उतार पाहता ग्राहक चिंता व्यक्त करत आहेत.

पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर (Gold Silver Rate Today 15 December 2024)

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७०,६८४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७७,११० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,६८४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७७,११० रुपये इतका आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,६८४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७७,११० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,६८४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७७,११० रुपये इतका आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Story img Loader