Gold Silver Rate Today 27 December 2024 :  सोन्याच्या दरात सातत्याने चढ -उतार होत आहे, पण आठवड्याभराचा विचार केल्यास, सोन्याच्या दरात जवळपास १५०० रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय चांदीचा दरही ८९ हजारांवर पोहोचला आहे. यात सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असल्याने सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी ज्वेलर्स दुकानात गर्दी करताना दिसतायत.दरम्यान तुम्हीही सोनं-चांदी खरेदी करणार असाल तर आज मुंबई, पुणे, नाशिकसह प्रमुख शहरांत २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर काय आहे जाणून घ्या…

देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 27 December 2024)

Gold and silver prices rise by Rs 3,100 per 10 grams and Rs 4,000 per kilogram in the past week.
Gold Rate : आठवड्याभरात सोन्याचे भाव हजारो रुपयांनी वाढले, चांदीही चकाकली
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Gold Silver Rate Today 4 february 2025
Gold Silver Price Today : अर्थसंकल्पानंतर सोनं-चांदी स्वस्त झालं की महाग? वाचा आजचा २४ कॅरेट सोन्याचा दर
सोन्याच्या दरात चारच तासात बदल… अर्थसंकल्पांतर पुन्हा…
Union Budget 2025 Gold Silver Price
Gold Silver Price Today : अर्थसंकल्पापूर्वी सोन्याचा दर ८२ तर चांदी ९३ हजार पार; दरात होतील का मोठे बदल? जाणून घ्या आजचे दर
Gold Price In India
Gold Price : सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? आर्थिक पाहणी अहवालात सोने-चांदीच्या दराबाबत वर्तवली मोठी शक्यता
Gold silver price
Gold silver Rate Today : सोन्याचा दर ८१ हजारावर, चांदीही महागली, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Gold Silver Price Today
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल, खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील २२, २४ कॅरेट सोन्याचा दर

इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, आज २७ डिसेंबर २०२४ रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर ७७,१२० रुपये प्रति १० ग्रॅम आहे, म्हणजे २६ डिसेंबरच्या तुलनेत सोन्याच्या ५० रुपयांची वाढ झाली आहे, त्यामुळे सोन्याच्या दरात कमी अधिक प्रमाणात का होईन वाढ झाल्याचे दिसून येते. तसेच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. आज १ किलो चांदीचा दर ८९,९४० रुपये आहे, पण २६ डिसेंबरच्या तुलनेत हे दर १६० रुपयांनी कमी झाले आहेत.

इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, शुक्रवार २७ डिसेंबरला सकाळी ११ वाजता २४ कॅरेट सोन्याचा दर ७७,१२० रुपये नोंदवला होता, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,६९३ रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवला गेला. आठवड्याभरापूर्वी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ७६ हजार ५८० रुपये इतका होता.

दरम्यान चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज १ किलो चांदीचा दर ८९,९०० रुपये नोंदवला गेला आहे. दरम्यान आठवड्याभरापूर्वी १ किलो चांदीचा दर जवळपास ८०,९४० रुपये होता. सोन्या-चांदीच्या दरात सतत होणारे चढ -उतार पाहता ग्राहक चिंता व्यक्त करत आहेत.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७०,५६५ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७६,९८० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,५६५ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७६,९८० रुपये इतका आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,५६५ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७६,९८० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,५६५ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७६,९८० रुपये इतका आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Story img Loader