Vande Bharat Express: ​​देशवासीयांना आज म्हणजेच २७ जून रोजी एकत्र पाच वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे. याच अनुषंगाने पीएम मोदी आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असून, त्यांनी या पाचही वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे. राणी कमलापती स्थानकावरून पंतप्रधान मोदींनी पाच वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला असून, राणी कमलापती-जबलपूर वंदे भारत एक्स्प्रेस व्यतिरिक्त उर्वरित चार गाड्यांना पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवलाय. एकाच दिवसात पाच सेमी हायस्पीड ट्रेन सुरू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यासह देशात एकूण २३ वंदे भारत गाड्या असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य प्रदेशला यावेळी दोन वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे. याशिवाय गोवा, बिहार आणि झारखंडला पहिली वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. कर्नाटकला दुसऱ्या वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे. बालासोर रेल्वे अपघातानंतर मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. मडगाव-मुंबई वंदे भारत दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिविम आणि मडगाव येथे थांबेल. आज चालवल्या जाणार्‍या आणखी वंदे भारत ट्रेनच्या मार्गाबद्दल जाणून घेऊ यात.

बंगळुरू-हुबळी-धारवाड वंदे भारत

बंगळुरू, हुबळी आणि धारवाडला जोडणाऱ्या वंदे भारतसह कर्नाटकमध्ये दोन सेमी हायस्पीड गाड्या सुरू होतील. ही ट्रेन दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये चालवली जाईल. यशवंतपूर, दावणगेरे आणि हुबळी स्थानकावर थांबणे अपेक्षित आहे. तसेच हुबळी आणि धारवाड दरम्यानचा ट्रेनने प्रवास वेळ ७ तासांवरून सुमारे ५ तासांपर्यंत कमी होणे अपेक्षित आहे.

हेही वाचाः देशाला आज मिळाली ५ वंदे भारत ट्रेनची भेट, PM मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

पाटणा-रांची वंदे भारत एक्सप्रेस

पाटणा आणि रांचीला जोडणारी ट्रेन म्हणून बिहारला पहिली वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. या ट्रेनला गया, कोडरमा, हजारीबाग रोड, पारसनाथ आणि बोकारो स्टील सिटी येथे थांबा मिळणे अपेक्षित आहे. ही ट्रेन सुमारे ४१० किमी अंतर कापणार आहे.

हेही वाचाः EPFO Higher Pension : हायर पेन्शनसाठी अर्ज करायचाय? EPFO ने अंतिम मुदत वाढवली

भोपाळ-इंदूर वंदे भारत ट्रेन

भोपाळ-इंदूर वंदे भारत एक्स्प्रेस ही मध्य प्रदेश आणि भोपाळ येथून धावणारी दुसरी ट्रेन असेल. ही ट्रेन राज्यातील अनेक शहरांना जोडणार आहे. मात्र, ट्रेनच्या थांब्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

भोपाळ-जबलपूर वंदे भारत

भोपाळ-जबलपूर वंदे भारत एक्सप्रेस ही मध्य प्रदेशातील तिसरी अर्ध हायस्पीड ट्रेन असेल. तसेच भोपाळच्या राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून धावणारी ही तिसरी ट्रेन असेल.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today the country got a gift of 5 vande bharat trains pm narendra modi showed the green flag vrd
Show comments