स्वत:ला महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेची आर्थिक स्थिती सध्या चांगली नाही. फिच रेटिंग एजन्सीने अलीकडेच अमेरिकेचे रेटिंग AAA वरून AA+ वर खाली आणले आहे. २०११ नंतर प्रथमच अमेरिकेच्या रेटिंगमध्ये कपात करण्यात आली आहे. अमेरिकेत दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. जुलैमध्ये ग्राहक महागाई ३.२० टक्क्यांवर पोहोचली आहे. अन्नपदार्थ हळूहळू सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. वाढती महागाई आणि मंदावलेली अर्थव्यवस्था यामुळे अमेरिकेत चोरी आणि लुटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळेच आता सर्वसामान्य दुकानदार आणि मोठ्या दुकानांना टूथपेस्ट, चॉकलेट, वॉशिंग पावडर, डिओडरंट यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू लॉक करून ठेवाव्या लागत आहेत.
अमेरिकेचे दरडोई उत्पन्न जगात सर्वाधिक आहे. पण वाढत्या महागाईमुळे तेथील सर्वसामान्यांची अवस्था आता दयनीय झाली आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात वारंवार वाढ करूनही महागाई नियंत्रणात येत नाही. वाढत्या व्याजदरामुळे उद्योगांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. यामुळे अर्थव्यवस्थेत मंदी आली आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य दुकानदारापासून वॉलमार्टपर्यंत लूट-चोरीच्या वाढत्या घटनांमुळे चिंता व्यक्त होत आहे. चोरी रोखण्यासाठी ते रोज नवनवीन युक्ती अवलंबत आहेत.
हेही वाचाः आता क्षणार्धात UPI द्वारे मिळणार लाखोंचं कर्ज, RBI ने केली मोठी घोषणा
फ्रीज केला लॉक
चोरी, लूट टाळण्यासाठी दुकानदार सामान्य वापराच्या वस्तू कुलूप बंद ठेवत आहेत. काही जण पारदर्शक भिंती लावत आहेत. फ्रीजमधून चॉकलेट, कोल्ड्रिंक्स यांसारख्या वस्तू कोणीही चोरू नयेत, यासाठी ते चेन असलेलं टाळं लावत आहेत. असे असतानाही चोरीच्या घटना कमी झालेल्या नाहीत. चोरी आणि लुटमारीला कंटाळून वॉलमार्टने शिकागोमधील चार स्टोअर्स यंदा बंद केले आहेत. औषध विकणारी CVS आणि Walgreens किंवा पादत्राणे म्हणजेच चपला विकणारी फूट लॉकर यांसारखी दुकाने चोरांच्या मागावर आहेत.
हेही वाचाः Money Mantra : EPF मधील शिल्लक गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी काढावी का? तज्ज्ञ म्हणतात…
महागाईने परिस्थिती बिघडली
यूएसमधील ग्राहक चलनवाढ जुलैमध्ये २० बीपीएसच्या वाढीसह ३.२० टक्क्यांवर पोहोचली आहे. जूनमध्ये ते तीन टक्के होते. वाढत्या महागाईमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांना त्यातून बाहेर काढणंही अवघड झालंय. महामारीच्या काळात यूएसमधील वैयक्तिक बचत २.१ ट्रिलियन डॉलरवर पोहोचली. जे २०२३ मध्ये सुमारे ९० टक्क्यांनी घसरून १९० अब्ज डॉलर झाले. २०२२ पासून दरमहा घरगुती बचतीत सुमारे १०० अब्ज डॉलरची घट होत आहे.