आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ९ नोव्हेंबर २०२३ पर्यंतच्या प्रत्यक्ष कर संकलनाची तात्पुरती आकडेवारी स्थिर वाढ नोंदवत आहे. एकूण प्रत्यक्ष कर संकलन १२.३७ लाख कोटी रुपये इतके झाले, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील एकूण संकलनापेक्षा १७.५९ टक्के जास्त आहे. परताव्याच्या स्वरुपात झालेले निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन १०.६० लाख कोटी रुपये इतके आहे आणि ते गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ संकलनापेक्षा २१.८२ टक्के जास्त आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात हे संकलन प्रत्यक्ष करांच्या एकूण अंदाजपत्रकाच्या ५८.१५ टक्के आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचाः दिवाळीपूर्वी सोने-चांदीच्या दरात घसरण, दुकानदारांना मोठी विक्रीची अपेक्षा

एकूण महसूल संकलनाच्या दृष्टीने कॉर्पोरेट प्राप्तिकर (सीआयटी) आणि वैयक्तिक प्राप्तिकर (पीआयटी) यांच्या वाढीचा दराचा विचार केल्यास सीआयटीसाठी वाढीचा दर ७.१३ टक्के आहे, तर पीआयटीसाठी २८.२९ टक्के (केवळ वैयक्तिक प्राप्तिकर) आणि पीआयटीसह सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT)२७.९८ टक्के इतका आहे.

हेही वाचाः Money Mantra : धनत्रयोदशीला सोने खरेदी करत असाल तर ‘या’ पाच गोष्टींची काळजी घ्या अन्यथा…

परताव्याच्या समायोजनानंतर सीआयटी संकलनातील निव्वळ वाढ १२.४८ टक्के आहे आणि पीआयटी संकलनातील वाढ ३१.७७ टक्के (केवळ PIT) तसेच ३१.२६ टक्के (सेवा प्राप्तिकरासह वैयक्तिक प्राप्तिकर) आहे. १ एप्रिल २०२३ ते ०९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत १.७७ लाख कोटी रुपये इतकी परताव्याची रक्कम जारी करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Total direct tax collection of rs 1237 lakh crore till 09 november 2023 in fy 2023 24 vrd