वृत्तसंस्था, नवी दिल्ली

खासगी क्षेत्रातील दूरसंचार कंपनी असलेल्या व्होडाफोन आयडियाच्या १,००० कोटींहून अधिक समभागांचे गुरुवारी व्यवहार पार पडले. एकाच कंपनीच्या समभागात मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री उलाढाल होण्याचा हा नवीन विक्रम आहे.

Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
loksatta kutuhal artificial intelligence and research in mathematics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
Nashik Voting, satellite phone, polling stations in Nashik district , Nashik latest news,
मतदानाच्या माहितीसाठी १० उपग्रहाधारित फोन, ८८ धावपटूंचा वापर, नाशिक जिल्ह्यात १०३ मतदान केंद्र संपर्कहिन
loksatta kutuhal artificial intelligence for scientific data analysis
कुतूहल – शास्त्रीय संशोधन : विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता

सार्वजनिक समभाग विक्रीपश्चात (एफपीओ) व्होडा-आयडियाच्या समभागात गुरुवारच्या सत्रात खूप मोठे चढ-उतार दिसून आले. मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात एकत्रित मिळून १,०५५ कोटी समभागांची खरेदी-विक्री पार पडली. या आधी २३ एप्रिलला व्होडा-आयडियाच्याच समभागांमध्ये उलाढालीच्या ३०८ कोटी समभाग संख्येचा विक्रम यातून मोडीत निघाला आहे. समभागाने सत्रात ११.९० रुपयांची नीचांकी तर १४.४० रुपयांची उच्चांकी पातळी गाठली.

मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या पाठबळामुळे कंपनीने एफपीओच्या माध्यमातून १८,००० कोटी रुपयांची यशस्वीरीत्या निधी उभारणी केल्यामुळे समभागात नवीन स्वारस्य निर्माण झाले आहे. कंपनीने ७४ सुकाणू गुंतवणूकदारांकडून (अँकर इन्व्हेस्टर) ५,४०० कोटी रुपयांची उभारणी केली. व्होडा-आयडियाने ११ रुपये प्रति शेअर या दराने सुकाणू गुंतवणूकदारांना ४९१ कोटी शेअरचे वाटप केले.

हेही वाचा >>>क्रेडिट कार्ड उसनवारी २७ टक्क्यांनी वाढून १८.२६ लाख कोटींवर

व्होडाफोन-आयडियाने फॉलो-ऑन समभाग विक्रीसाठी (एफपीओ) प्रति समभाग १० ते ११ रुपये किमतीपट्टा निश्चित केला होता. १८ एप्रिल ते २२ एप्रिलदरम्यान भागविक्री पार पडली होती. एफपीओला ६.३६ पट अधिक प्रतिसाद प्राप्त झाला होता.

एफपीओ नवसंजीवनी ठरणार

व्होडाफोन आयडियाने १८,००० कोटी रुपयांचा निधी उभारणे ही कंपनीसाठी नवसंजीवनी ठरणार आहे. यामुळे येत्या काळात दूरसंचार कंपनी पुनरागमन करेल, असे आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांनी गुरुवारी सांगितले. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या मोठ्या प्रतिस्पर्ध्यांच्या आक्रमक खेळामुळे ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी धडपडणारी ही कंपनी आपला विस्तार वाढवण्यावर आणि निवडकपणे ५जी सेवा सादर करण्यावर लक्ष केंद्रित करेल, असे बिर्ला यांनी सांगितले. एफपीओच्या माध्यमातून उभारलेला पैसा व्यवसायात पुन्हा गुंतवला जाईल, ज्यामुळे वाढीचे चक्र सुरू होईल, असेही ते म्हणाले.