मोदी सरकारने ट्रक चालकांसाठी नवा नियम आणल्यामुळे देशभरातील ट्रकचालकांनी वाहतूक कोंडी निर्माण केली आहे. नवीन नियमानुसार, जर कोणी वाहनाला धडक दिली आणि घटनास्थळावरून पळून गेला तर त्याला १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. याशिवाय मोठा दंडही भरावा लागणार आहे. या नियमाविरोधात ट्रकचालकांनी तीन दिवसांचा संप जाहीर केला आहे. बिझनेस टुडेनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. ट्रकचालकांच्या संपामुळे महागाई वाढण्याचा धोका वाढला आहे. एकट्या मुंबईत दररोज १.२० लाख ट्रक आणि कंटेनर एमएमआर प्रदेशात येतात. महाराष्ट्राशिवाय मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल, उत्तर प्रदेश, बिहारसह देशातील अनेक भागांत या संपाचा परिणाम दिसून येत आहे.

४५० कोटींचे नुकसान

परिवहन मंडळाच्या म्हणण्यानुसार, एक दिवसाच्या संपामुळे १२० ते १५० कोटी रुपयांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. अशा स्थितीत ३ दिवसांच्या संपामुळे ४५० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या संपामुळे देशभरात महागाई वाढण्याचा धोका वाढला आहे. लोकांना पेट्रोल आणि डिझेलची चिंता वाटू लागली आहे. ट्रक हे वाहतुकीचे एक असे माध्यम आहे, ज्याद्वारे फळे आणि भाजीपाल्यापासून सर्व जीवनावश्यक वस्तू एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेल्या जातात. आता चालकांच्या संपामुळे देशभरात वाहतूक कोंडी झाली आहे.

Mumbai Nashik Highway Accident Latest Updates in Marathi
Mumbai Nashik Highway Accident : मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
ST bus brakes fail at Anaskura Ghat Drivers saves 50 passengers lives
अणस्कुरा घाटात एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधाने वाचले ५० प्रवाशांचे प्राण
Mahakumbh mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमुळे मिळणार २००० कोटींची आर्थिक चालना; अर्थव्यवस्था काय सांगते?
Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण
Mumbai transport department Japan policy
वाहन खरेदीवर नियंत्रण आणण्याचा परिवहन विभागाचा विचार, जपानच्या धर्तीवर नवे धोरण राबविणार
private bus drivers, Amravati, RTO, action by RTO,
अमरावती : खासगी बसचालकांना दणका, आरटीओकडून दंडात्मक कारवाई

हेही वाचाः नवीन वर्षात स्विगीद्वारे बिर्याणीची रेकॉर्ड ब्रेक विक्री, ऑर्डर देण्यात ‘हे’ शहर राहिले आघाडीवर

महागाई वाढू शकते

पेट्रोल पंप असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, ३-४ दिवसांच्या संपाचा परिणाम संपूर्ण देशात दिसून येईल. मात्र, दुचाकी वाहनधारक ३-४ दिवसांसाठी पेट्रोलचा साठा करू शकतात. मात्र मोठी वाहने आणि चारचाकी वाहनांची अडचण आहे. कारण संप जास्त दिवस सुरू राहिला तर आमचा साठा संपेल. पंपावर पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नसताना त्याचा परिणाम सर्वत्र दिसून येईल. त्याचबरोबर ट्रकचालकांच्या संपामुळे फळभाज्यासह सर्वच खाद्यपदार्थांचा पुरवठा ठप्प होण्याचा धोका वाढणार आहे. त्यामुळे महागाईचा धोका वाढणार आहे.

हेही वाचाः Money Mantra : तुमच्या नावे इतर कोणी कर्ज घेतले आहे का? आता काही मिनिटांतच समजणार

चालकांना काय अडचण आहे?

हिट अँड रन प्रकरणात नवीन कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या कारला धडक दिल्यास आणि गाडीचा मालक घटनास्थळावरून पळून गेल्यास त्याला मोठ्या दंडाची शिक्षा देण्याची तरतूद आहे. त्याचबरोबर वाहनाला धडक देणारी व्यक्ती अपघाताने वाहनासमोर आली किंवा ती चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडत असेल तर अशा वेळी वाहनचालकांना दिलासा मिळेल. मात्र, अशा प्रकरणांमध्येही ५ वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीबाबत वाहनचालकांची अडचण आहे. नवीन कायद्यानुसार आमची चूक नसली तरी ५ वर्षांची शिक्षा भोगावी लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

Story img Loader