देशातील सर्वात मोठ्या मोटर कंपन्यांपैकी एक असलेल्या TVS मोटरने तमिळनाडूतील मिचॉन्ग चक्रीवादळामुळे झालेल्या पूर आणि नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी मुख्यमंत्री मदत निधीला ३ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. TVS मोटर्सने सांगितले की, ते पूरग्रस्त ग्राहकांसाठी अतिरिक्त सेवा समर्थन प्रदान करतील.

कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, या पैशाचा वापर अत्यावश्यक पूर मदत आणि चक्रीवादळामुळे वाईटरीत्या प्रभावित झालेल्यांना मदत देण्यासाठी केला जाणार आहे. TVS मोटर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू म्हणाले, पुरामुळे समाजावर गंभीर संकट ओढवले आहे आणि आम्ही समुदायाला मदत करण्यासाठी आमची भूमिका बजावू इच्छितो.

Income tax slabs for 2025-26 explained with focus on individuals earning slightly above Rs 12 lakh and marginal relief.
१२ लाखांपेक्षा थोडेसे जास्त उत्पन्न असणाऱ्यांना कर सवलत मिळणार का? जाणून घ्या कसा मोजायचा Marginal Relief चा लाभ
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
true friend in volatile market conditions Multi-asset funds
अस्थिर बाजार परिस्थितीतील खरा मित्र – मल्टी ॲसेट फंड
Budget is satisfactory but is the curse of self-reliance to producers
अर्थसंकल्प ‘समाधानकारक’ पण आत्मनिर्भरतेचा उत्पादकांना शाप?
income tax
छोटी…छोटी सी बात!
A budget that makes you aware of your limitations
वित्त: मर्यादांची जाणीव करून देणारा अर्थसंकल्प
Budget 2025 News
Budget 2025 : १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त; १ लाख कोटींचा तोटा सहन करत मध्यमवर्गाला भेट
dsp mutual funds
फंडांचा फंडा: डीएसपी मिड कॅप फंड

हेही वाचाः PHOTO : सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल १५० खोल्या, किंमत जाणून धक्का बसेल!

अशोक लेलँड यांनीही देणगी दिली

व्यावसायिक वाहन निर्माता अशोक लेलँडने आज चक्रीवादळ मिचॉन्ग प्रभावित राज्यात मदतकार्य आणि मदतीसाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री मदत निधीला ३ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. अशोक लेलँडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ शेनू अग्रवाल म्हणाले, “चक्रीवादळ आणि संततधार पावसामुळे झालेल्या विध्वंसामुळे आम्ही खूप दुःखी आहोत, ज्यामुळे चेन्नई आणि आसपासच्या जिल्ह्यांमधील अनेक लोकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. या कठीण परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि आवश्यक मदत उपाययोजना सुनिश्चित करण्यासाठी तामिळनाडू सरकारने दाखवलेला तत्पर प्रतिसाद पाहून आनंद होत आहे.

हेही वाचाः Money Mantra : म्युच्युअल फंड एसआयपी आता २५० रुपयांपासून सुरू करता येणार, सेबी प्रमुखांनी सांगितली योजना

चक्रीवादळ चेन्नईत कहर माजवत आहे

मिचॉन्ग या चक्रीवादळाने राजधानी चेन्नईसह तामिळनाडूच्या इतर शहरांमध्ये उद्ध्वस्त केली आहे. पिण्याच्या पाण्याच्या समस्येशिवाय इतर जीवनावश्यक वस्तूही लोकांना मिळत नाहीत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन या आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी आपला एक महिन्याचा पगार दान करणार आहेत.

Story img Loader