टीव्हीएस मोटर कंपनी आणि सुंदरम क्लेटन यांची सामाजिक कार्ये करणारे अंग असलेल्या ‘श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्ट’ने (एसएसटी) २००४ मध्ये आलेल्या त्सुनामीनंतर तामिळनाडूमध्ये सामाजिक कार्याला सुरुवात करून स्थानिक लोकांच्या सामाजिक, आर्थिक स्तर उंचावण्यात मोलाची मदत केली. टीव्हीएसने ‘एसएसटी’च्या माध्यमातून जलसंधारण, महिला बचतगट, आरोग्य आणि शिक्षणाच्या पायाभूत सुविधा, पर्यावरण रक्षण, कृषी आणि पशुधन उत्पन्न वाढ अशा विविध क्षेत्रात सुधारणांसाठी मदत केली आहे. ‘एसएसटी’द्वारे नियोजनापासून ते उपक्रमांच्या अंमलबजावणीपर्यंत कार्य केले जाते.

हेही वाचाः मोदी सरकार बीपीसीएलला विकून १८ हजार कोटी रुपये जमवणार

Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
pune private hospital pollution
पुणे: खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा ! नियमांचे पालन न केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पाऊल
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ
Maharashtra government financial burden
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?
sharad pawar ncp leader jayant patil slams ladki bahin yojana
लाडकी बहीण’मुळे सरकारची तिजोरी रिकामी – जयंत पाटील

श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्टने तामिळनाडूतील गावांमध्ये जलसंधारण सुधारणेच्या प्रयत्नांमध्ये २१ कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. ज्यामुळे पाणी साठवण क्षमता १६० कोटी लिटर वाढवण्यास मदत झाली आहे. शिवाय, स्थानिक समुदायांच्या सक्रिय सहभागाने आणि राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डच्या सहकार्याने, पाणलोट कार्यक्रम राबवून विविध जिल्ह्यांमध्ये लहान बंधारे आणि १०० हून अधिक तलावांची निर्मिती केली गेली आहे. याचबरोबर बचत गटाच्या माध्यमातून ‘ट्रूली कॉटेज’ या नाममुद्रेअंतर्गत शेतीशी संबंधित उत्पादने बाजारात आणली असून, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये त्याचा महसूल वार्षिक १.३ कोटींवर पोहोचला आहे.

हेही वाचाः मोदी सरकार बीपीसीएलला विकून १८ हजार कोटी रुपये जमवणार

समुदायाच्या सहभागातून गावांमध्ये शाश्वत विकास घडवून आणणे हे ‘एसएसटी’चे लक्ष्य आहे. महिला आणि मुलांचा विकास, पाण्याचे संवर्धन, सरकारी पायाभूत सुविधांचे नूतनीकरण करून सर्वांगीण आरोग्य आणि शिक्षणाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि पर्यावरणाचे रक्षण याद्वारे शाश्वत समाजाची उभारणी करणे ही तिची मुख्य कार्यक्षेत्रे आहेत.