नवी दिल्ली : नोकरकपात आणि खर्चात कपातीवर भर देणाऱ्या ‘ट्विटर’ने दिल्ली आणि मुंबईतील कार्यालये बंद केली असून, कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. मोठ्या प्रमाणात अभियांत्रिकी कर्मचारी असलेले कंपनीचे बंगळूरु कार्यालय केवळ कार्यरत राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिल्ली आणि मुंबईची कार्यालये काही ‘आठवड्यांपूर्वीच बंद झाली आहेत. तथापि, यातून प्रभावित कर्मचाऱ्यांची नेमकी संख्या कळू शकली नाही. गेल्या वर्षी अब्जाधीश एलॉन मस्क यांनी ट्विटरचे संपादन केल्यानंतर, जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर खर्चात कपात करण्याची मोहीम सुरू केली असून, त्याच मालिकेत भारतातील दोन ठिकाणची कार्यालये बंद झाली आहेत. कंपनीने जगभरातून ७,००० हून अधिक लोकांना कमी करून पटावरील कर्मचाऱ्यांची संख्या २,३०० वर आणली आहे. भारतातील देखील २०० हून अधिक कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश कर्मचाऱ्यांना नारळ दिला गेला असून, अभियांत्रिकी, विक्री-विपणन आणि संपर्क या विभागातील मोजक्याच कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचू शकल्या आहेत.