मुंबईः सहकार क्षेत्रातील जीपी पारसिक बँकेने २,५०० कोटी ते ५,००० कोटी रुपयांपर्यंत ठेवी असलेल्या बँकांच्या श्रेणीत, द महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशन लिमिटेडतर्फे देण्यात येणाऱ्या सर्वोत्कृष्ट बँकेचा दि्वतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ  यांच्या हस्ते आणि फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा, सनदी अधिकारी डॉ. दीपक तावरे यांच्या उपस्थितीत जीपी पारसिक बँकेचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी हा पुरस्कार समारंभपूर्वक स्वीकारला. या प्रसंगी बँकेचे संचालक नारायण गावंड, दशरथ पाटील, कय्यूम चेऊलकर आणि संचालिका राजश्री पाटील उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दुसरीकडे, बुडीत कर्जाच्या उत्तम व्यवस्थापनाबद्दल सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार ‘बँकिंग फ्रंटियर्स’चा विशेष पुरस्कार जीपी पारसिक बँकेचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी बँकिंग तज्ज्ञ प्रमोद कर्नाड यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी बँकेचे संचालक नारायण गावंड, रणजीत पाटील, रमाकांत लाहोटी, दशरथ घरत, संचालिका राजश्री पाटील, बँकेचे सीईओ डॉ. एम. डी. पै, बँकिंग फ्रंटियर्सचे संचालक बाबू नायर, समूह संपादक मनोज अग्रवाल आदी उपस्थित होते.