संजय जाधव
पुणे : देशात विद्युत शक्तीवरील वाहनांचा अर्थात ई-वाहनांच्या विक्रीतील जोमदार वाढ कायम असून, चालू वर्षातील पहिल्या तीन महिन्यांत ई-वाहनांच्या विक्रीने दरमहा एक लाखांचा टप्पा पार केला. ई-वाहनांमध्ये सर्वाधिक मागणी दुचाकी आणि तीनचाकीला मिळताना दिसत आहे.
चालू वर्षात जानेवारीपासून ४ एप्रिलपर्यंत ई-वाहनांच्या विक्रीची आकडेवारी ‘सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल्स (एसएमईव्ही)’ या संघटनेने संकलित केली आहे. या आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यात देशात १ लाख २ हजार ५१४ ई-वाहनांची विक्री झाली. त्यामध्ये दुचाकी सर्वाधिक ६४ हजार ६४१ होत्या. त्याखालोखाल तीनचाकी ३४ हजार ३०४ होत्या. चारचाकी आणि बसची विक्री अनुक्रमे ३ हजार ४७१ आणि ९८ होती.
फेब्रुवारी महिन्यात देशात १ लाख ६ हजार ८८९ ई-वाहनांची विक्री झाली. त्यात सर्वाधिक ६५ हजार ९८२ दुचाकींची विक्री झाली. त्यापाठोपाठ तीनचाकी वाहनांची विक्री ३५ हजार ९९५ झाली. चारचाकीची विक्री ४ हजार ८१३ तर बसची विक्री ९९ झाली. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात ई-वाहनांची विक्री एक लाखाच्या पुढे असली तरी त्यात मोठी तफावत नव्हती.
मार्चमध्ये मात्र जानेवारी आणि फेब्रुवारीच्या तुलनेत विक्रीत मोठी वाढ झाली. मार्चमध्ये ई-वाहनांची विक्री १ लाख ३९ हजार ८४१ वर पोहोचली. त्यात दुचाकींच्या विक्रीतही वाढ होऊन ती ८५ हजार ८५९ वर गेली. तीनचाकींची विक्री ४५ हजार २२१ वर पोहोचली. चारचाकींची विक्री ८ हजार ६७१ तर बसची विक्री ९० झाली. एप्रिल महिन्यात ४ तारखेपर्यंत एकूण ९ हजार ६६३ वाहनांची विक्री झाली. यात दुचाकी ६ हजार २५९, तीनचाकी २ हजार ९०८, चारचाकी ४६१ आणि बस ३५ अशी विक्री झाली.
हिस्सेदारी पाच टक्क्यांपर्यंत
देशातील एकूण वाहनसंख्येत ई-वाहनांची संख्या १ टक्क्याहून कमी आहे. पुढील काही वर्षांत हे प्रमाण ५ टक्क्यांवर पोहोचेल. सध्या ई-वाहनांमध्ये दुचाकींची संख्या अधिक आहे. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींनुसार विक्रीत चढउतार होत आहेत. देशातील रस्त्यांवर धावणाऱ्या ९० टक्के ई-स्कूटर या कमी वेगाच्या असल्याने (ताशी २५ किलोमीटर) त्यांच्या नोंदणीची गरज पडत नाही, असे सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल्सने (एसएमईव्ही) म्हटले आहे.