भारतात सध्या निवडणुकीचे वातावरण असून, देशाला गुंतवणुकीची गरज आहे. अशा परिस्थितीत UAE आपल्या मित्राच्या मदतीसाठी धावून येऊ शकतो. होय, आखाती देशांमध्ये भारताचा सर्वात चांगला मित्र UAE येथे मोठी गुंतवणूक करू शकतो, अशा बातम्या येत आहेत. ही गुंतवणूक सुमारे ५० अब्ज डॉलर्स म्हणजेच ४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. ही बातमी सध्या विदेशी गुंतवणुकीसाठी आसुसलेल्या चीनला अस्वस्थ करू शकते. दुसरीकडे पाकिस्तानला धक्का बसू शकतो, कारण शेजारील देश आखाती देशांसमोर कटोरा घेऊन मदत मागताना आपल्याला पाहायला मिळालेलाच आहे.

ही बातमी भारताच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केल्यास ती चांगली ठरू शकते. यालाही कारणही तसेच आहे. पहिली गोष्ट म्हणजे भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असलेल्या UAE बरोबरचे संबंध आणखी सुधारतील. तर दुसरे म्हणजे हा पैसा भारताचे उत्पादन क्षेत्र आणि पायाभूत सुविधांना मोठ्या प्रमाणात बळकट करू शकेल. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. भारताला गुंतवणुकीची नितांत गरज असताना ही बातमी आली आहे. जेणेकरून पायाभूत कामांना आणखी गती मिळू शकेल.

mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
s and p global ratings
अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणार – एसअँडपी; नवीन वर्षात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर दिलासा शक्य
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
PM Modi
PM मोदींचा ‘मेक इन इंडिया’ पाठोपाठ आता ‘वेड इन इंडिया’वर भर; देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दलही केलं मोठं वक्तव्य
Cotton is a key kharif crop in India, with Maharashtra producing 90 lakh bales
बांगलादेशातील अराजकता अन् कापूस उत्पादकांना लाभ

हेही वाचाः ”माझी शिफ्ट संपली; आता मी निघतोय…”, मूर्तींच्या ७० तास काम करण्याच्या पद्धतीवर Gen Z चा प्रतिसाद पाहा

१०० अब्ज डॉलरचा व्यवसाय

सध्या भारताचे किंबहुना पंतप्रधान मोदींचे UAE बरोबरचे संबंध खूप मजबूत झाले आहेत. २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी चार वेळा यूएईला भेट दिली आहे. याआधी १९८१ मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शेवटची वेळ UAE ला भेट दिली होती. त्याचबरोबर यूएईलाही भारताबरोबरचे संबंध अधिक दृढ करायचे आहेत. यामागे एक कारण आहे, भारताचा आर्थिक विकास जगातील मोठ्या देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. UAE भारतात ५० अब्ज डॉलर्सचा गुंतवण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे. सध्या UAE आणि भारत यांच्यातील गैर तेल द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.

हेही वाचाः दोन हजारांच्या नोटा जमा करायच्या आहेत? आता रांगेत ताटकळत उभं राहण्याची गरज नाही, वाचा सविस्तर

भारतातील मध्यमवर्गाकडे UAE चे लक्ष्य

यूएईला या गुंतवणुकीतून भारतातील मध्यमवर्गाला लक्ष्य करायचे आहे. याला कारणही तसेच आहे. भारतातील मध्यमवर्गाचा देशाच्या लोकसंख्येमध्ये मोठा वाटा आहे. भारतात अशा लोकांची संख्या सुमारे ४४ कोटी आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, या वर्गाचा भारताच्या अर्थव्यवस्थेत आणि विकासात मोठा वाटा आहे. २०३०-३१ पर्यंत भारतातील या विभागाची संख्या ७१.५ कोटीपर्यंत पोहोचू शकते, जी एकूण लोकसंख्येच्या ४७ टक्के इतकी आहे. अशा स्थितीत UAE ची भारतातील भागीदारी अतिशय विचारपूर्वक केली आहे. परंतु ही घोषणा कधी होईल हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण २०२४ च्या निवडणुकीपूर्वी त्याची घोषणा होऊ शकते.

UAE मध्ये ३० टक्के भारतीय

भारतासाठी जसा यूएई महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे यूएईसाठी भारत नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. UAE च्या एकूण लोकसंख्येमध्ये भारतातील लोकांची संख्या सुमारे ३० टक्के आहे, यावरून याचा अंदाज लावता येतो. हे ३० टक्के लोक परकीय चलनाच्या रूपात भारताला पैसे पाठवतात, त्यामुळे भारताचा परकीय चलनाचा साठा पाकिस्तानच्या तुलनेत १०० पट जास्त आहे. रिपोर्टनुसार, केरळमधील लोक यूएईमध्ये भारतातील लोकांना भेटतात. येत्या काही दिवसांत UAE मध्ये भारतीयांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

चीनला कशाची भीती सतावतेय?

UAE आणि भारत यांच्यातील सुधारलेले आर्थिक संबंध चीन आणि पाकिस्तान दोघांनाही अस्वस्थ करू शकतात. प्रथम चीनबद्दल बोलायचे झाल्यास चीनच्या अडचणीतही वाढ होऊ शकते, कारण भारतात सातत्याने परदेशी गुंतवणूक येत आहे. म्हणजे भारताच्या आर्थिक विकासाला आणखी चालना मिळेल आणि येत्या काही वर्षांत भारत आर्थिक आघाडीवर चीनला मागे टाकून आशियाचा नेता बनू शकेल. गेल्या काही महिन्यांत ज्या परदेशी कंपन्या पूर्वी चीनमध्ये काम करीत होत्या, त्या भारतात येत आहेत. ज्यामध्ये Apple चे नाव ठळकपणे घेतले जाऊ शकते. टेस्ला भारतातही येत आहे. मायक्रॉन, फॉक्सकॉन आणि इतर अनेक तैवानच्या कंपन्या भारतात येत आहेत आणि गुंतवणूक करीत आहेत आणि भारताला जगातील सर्वात मोठा कारखाना बनवण्यासाठी मदत करत आहेत. जो आतापर्यंत चीनचा होता. अशा स्थितीत चीनला चिंता वाटणे स्वाभाविक आहे.

पाकिस्तानला आश्चर्य का वाटेल?

UAE हा मुस्लिम देश आहे आणि पाकिस्तानदेखील मुस्लिम देशांच्या श्रेणीत आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती कोणापासून लपलेली नाही. कधी चीनकडे तर कधी IMF आणि आखाती देशांकडे हात पसरणे ही पाकिस्तान सरकारची सवय झाली आहे. हा मुस्लिम देश असल्याचे सांगत पाकिस्तानने वारंवार UAE कडे एक ते दोन अब्ज डॉलर्सची मदत मागितली आहे. अशा परिस्थितीत UAE भारतात ५० अब्ज डॉलर्स किंवा त्याहून अधिक गुंतवणूक करत असल्याचे पाकिस्तानला कळले तर त्याचे काय होईल? हे न सांगितलेलेचं बरे. UAE ने आधी त्यांच्याकडे गुंतवणूक करावी, अशी पाकिस्तानची इच्छा आहे, पण हे शक्य नाही. कारण पाकिस्तानमध्ये असे काहीही नाही, ज्यावर पैज लावतील. राजकीय स्थैर्यही नगण्य आहे. दहशतवाद शिगेला पोहोचला आहे. जे UAE ला अजिबात आवडत नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे यूएईकडे पाऊल आश्चर्यचकित करणारे ठरू शकते.

Story img Loader