जागतिक पातळीवरील आर्थिक घडामोडींमध्ये महत्वाची घटना मे महिन्यात घडली. क्रेडिट सुईस या बलाढ्य कंपनीला आपल्या व्यवहारांचा गाशा गुंडाळ्याची वेळ आली. स्विझर्लंड मधील यूबीएस या कंपनीने आपलेच व्यावसायिक प्रतिस्पर्धी असलेल्या क्रेडिट सुईसला तीन अब्ज स्विस फ्रँक म्हणजे अंदाजे साडेतीन अब्ज डॉलर्स मध्ये विकत घेण्याचा निर्णय जाहीर केला. ही घटना का महत्त्वाची आहे हे समजून घेण्यासाठी आधी क्रेडिट सुईस बद्दल आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल माहिती घ्यावी लागेल. १६० वर्षांपेक्षा अधिक काळ आर्थिक व्यवहारात आघाडीवर असलेली ही कंपनी एका रात्रीत रस्त्यावर आली का ? या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. २००८ या वर्षी जागतिक बँकिंग क्रायसिस आल्यावर ज्याप्रमाणे कंपन्या धोक्यात येऊ लागल्या तसंच काहीसं घडेल की काय, अशी शक्यता तीन महिन्यांपूर्वी जगात निर्माण झाली होती.

क्रेडिट सुईस ही कंपनी नेमकं करते काय?

परदेशातल्या बँका फक्त आपल्यासारखी कर्ज वितरित करणे आणि लोकांकडून डिपॉझिट गोळा करणे एवढी कामे करीत नाहीत. अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून टाकण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. बलाढ्य प्रोजेक्ट्सना कर्जपुरवठा करणे, मोठ्या प्रमाणावर छोट्या गुंतवणूकदारांकडून पैसा जमा करून वेगवेगळ्या देशातील बाजारपेठांमध्ये गुंतवणे, अशी कामे क्रेडिट सुईस करते. जगातील व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ५० बँका विचारात घेतल्या तर त्यात या कंपनीचा समावेश होतो. वेल्थ मॅनेजमेंट, असेट मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट बँक, कॅपिटल रिलीज युनिट अशा चार व्यवसायांमध्ये क्रेडिट सुईस अस्तित्वात आहे.

rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
PMC Bank Scam Hearing on petitions of aggrieved account holders on December 12 mumbai news
पीएमसी बँक घोटाळा; पीडित खातेधारकांच्या याचिकांवर १२ डिसेंबरला सुनावणी
hearing in bombay high court after two years in pmc bank scam
पीएमसी बँक घोटाळ्यात दोन वर्षांनंतर आज सुनावणी
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…
boney kapoor financial crisis roop ki raani movie
दिग्दर्शकाने अर्ध्यावर सोडली साथ; फ्लॉप झाला बिग बजेट सिनेमा, बोनी कपूर यांना कर्ज फेडायला लागली होती ‘इतकी’ वर्षे

स्विझर्लंडमधली आकाराने आणि व्यवसायाने दुसरी मोठी बँक आहे, असं असलं तरीही या बँकेतील उच्च अधिकाऱ्यांवर पैशाच्या अफरातफरीचे, नियमबाह्य गुंतवणूक केल्याचे आरोप केले गेले होते. फेब्रुवारी २०२० मध्ये तत्कालीन सीईओ तिजां तियाम (Tidjane Thiam) यांनी राजीनामा दिला. त्यानंतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मालिका सुरू झाली. फेब्रुवारी महिन्यातच बँकेने अधिकृतरित्या असे कबूल केले की बड्या गुंतवणूकदारांनी जवळपास १०० अब्ज डॉलर एवढी रक्कम काढून घेतली आहे. अशा वेळी बँक वाचवण्यासाठी कोणत्यातरी बड्या गुंतवणूकदारांची फळी उभी राहणे आवश्यक असते. मात्र २००८ मध्ये जेव्हा असे गुंतवणूकदार बुडणाऱ्या बँकांमध्ये पैसे ठेवायला पुढे आले होते तेव्हा त्यांना ते पैसे वसूल करायला म्हणजेच नफा मिळायला खूप कालावधी जावा लागला.

हेही वाचाः शेअर बाजाराची रेकॉर्ड ब्रेक सुरुवात; सेन्सेक्स, निफ्टीने गाठला नवा उच्चांक; अदाणी समूह आणि एसबीआयचे शेअर वधारले

म्हणून क्रेडिट स्विसला सहजासहजी गुंतवणूकदार मिळत नव्हते. याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. क्रेडिट सुईस शेअर ७५ टक्क्यांपर्यंत कोसळला. ही कंपनी बुडणे जागतिक आर्थिक व्यवस्थेसाठी लाल झेंडाच होता. जगभरात पन्नास हजार कर्मचारी, ५० देशात १५० पेक्षा अधिक कार्यालय असलेली ही कंपनी धनाड्य गुंतवणूकदार, व्यापारी, व्यावसायिक आणि अति श्रीमंत लोकांची बँक होती. २०२३ या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने आम्ही पुन्हा एकदा आश्वासक कामगिरी बजावू असे गुंतवणूकदारांना सांगितले. गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत, असाही आशावाद दाखवला. ‘सौदी नॅशनल बँक’ या कंपनीने बुडत्या क्रेडिट सुईस मध्ये आपले पैसे गुंतवले, मात्र एका मर्यादेनंतर त्यांनी आणखी गुंतवणूक करणे शक्य नाही हे स्पष्ट केले. कालांतराने स्विझरलँडमधील यूबीएस या कंपनीने क्रेडिट सुईस विकत घेण्याचा इरादा स्पष्ट केला. १९ मार्च २०२३ रोजी ही घोषणा करण्यात आली आणि याच महिन्यात १२ जून २०२३ रोजी सर्व आवश्यक त्या परवानगी प्रक्रिया पार पडल्यावर यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

हेही वाचाः Money Mantra : श्रीमंत व्हायचंय! मग कंपाऊंडिंग शक्ती वापरा अन् ‘या’ १० गोष्टींचं पालन करा

एकाच देशातील दोन कंपन्या एकत्र आल्या की सहाजिकच आपणच आपल्या स्पर्धकाला विकत घेतल्यावर कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. बँकेचा ताबा घेतल्यावर यूबीएस ने काल एक महत्त्वाची घोषणा केली आणि ती अपेक्षेप्रमाणे क्रेडिट सुईसच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत होती. लंडन, न्यूयॉर्क आणि आशियातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये कार्यरत असलेले क्रेडिट सुईसचे निम्मे कर्मचारी यूबीएसला आता नकोसे झाले आहेत. म्हणजेच त्यांची गरज नाही यूबीएस ने एकूण ३० टक्के म्हणजेच जवळपास ३५००० कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने कमी केले जाईल, अशी घोषणा केली आहे. स्विझर्लंडमध्ये जवळपास १० हजार जणांचा जॉब जाणार आहे. या वर्षात जुलै महिन्याच्या अखेरीस पहिल्या टप्प्यात आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अशा तीन टप्प्यांमध्ये कर्मचारी कपातीचे धोरण यूबीएस अमलात आणणार आहे. यूबीएसने क्रेडिट सुईस विकत घेतल्यावर एकत्रित कर्मचाऱ्यांची संख्या एक लाखापलीकडे पोहोचली. त्यामुळे खर्च वाचवण्यासाठी हे केलं जाईल, अशी अपेक्षा होतीच. जगभरातले बाजार याकडे आता कशा पद्धतीने पाहतात ते बघणं महत्त्वाचं ठरेल.