UCO Bank IMPS Problem : UCO बँकेच्या IMPS सेवेतील तांत्रिक बिघाडाबाबत सरकारी बँकेने गुरुवारी स्पष्टीकरण दिले आहे. तांत्रिक अडचणींमुळे अडकलेली सुमारे ७९ टक्के रक्कम वसूल करण्यात आल्याचे बँकेने म्हटले आहे. UCO बँकेने सध्या IMPS हस्तांतरण थांबवले आहे. या समस्येमुळे इतर बँकांकडून IMPS हस्तांतरणाची रक्कम युको बँकेत येत नव्हती. स्टॉक एक्सचेंज (BSE) ला माहिती देताना बँकेने सांगितले की, १० ते १३ नोव्हेंबरदरम्यान अशा समस्या आल्यात. १६ नोव्हेंबर रोजी बँकेचे शेअर्स खाली पडले आणि ३९.६७ रुपयांवर उघडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

८२० कोटी रुपये अडकले होते

आयएमपीएस सेवेतील समस्येमुळे सुमारे ८२० कोटी रुपये अडकले असल्याचे बँकेने म्हटले आहे. यापैकी अंदाजे ६४९ कोटी रुपये वसूल झाले आहेत, जे एकूण रकमेच्या ७९ टक्के आहेत. उर्वरित १७१ कोटी रुपयेही लवकरच वसूल केले जातील. या प्रकरणाची माहिती कायदा अंमलबजावणी यंत्रणांनाही देण्यात आली आहे.

हेही वाचाः २०२४ मध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांना सुट्ट्याच सुट्ट्या, पुढील वर्षीच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

सायबर हल्ल्याची भीती

काही बँकर्स IMPS मधील समस्येला UCO बँकेवरील सायबर हल्लादेखील म्हणत आहेत. यासंदर्भात कोलकाता येथील बँकेने ही अंतर्गत तांत्रिक बाब असल्याचे म्हटले आहे. यामुळे बँक ग्राहकांना आयएमपीएसद्वारे काही चुकीचे क्रेडिट मिळाले. लोकांना पैसे जमा झाल्याचे मेसेज येत होते. मात्र, त्यांच्या खात्यात पैसे येत नव्हते. अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर बँकेने पुढील सूचना मिळेपर्यंत IMPS सेवा ऑफलाइन केली आहे. बँकेने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) या प्रकरणाची माहिती दिली असून तपास सुरू आहे.

हेही वाचाः नारायण अन् सुधा मूर्ती पुन्हा झाले आजी-आजोबा; मुलगा रोहनला पुत्ररत्नाची प्राप्ती

IMPS म्हणजे काय?

IMPS ही रिअल टाइम इंटरबँक इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सिस्टम आहे. ते UPI शी जोडलेले आहे. IMPS अंतर्गत दररोज ५ लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येतात. या सेवेद्वारे पैसे त्वरित ऑनलाइन हस्तांतरित केले जाऊ शकतात. व्यावसायिक आस्थापने या सेवेचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uco bank recovers rs 649 crore despite technical glitch in imps rs 171 crore still stuck vrd
Show comments