मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या यूको बँकेने डिसेंबरअखेर सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत ६३८.८३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला, जो मागील वर्षीच्या तिमाहीतील ५०२.८३ कोटी रुपये नोंदवला गेला होता. त्यात २७ टक्क्यांची वाढ झाली आहे. व्याज उत्पन्नातील वाढीमुळे बँकेच्या नफ्यात भरीव वाढ झाली आहे.

बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न वार्षिक आधारावर १,९८८ कोटींवरून १९.६ टक्क्यांनी वधारून २,३७७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तरतुदीपूर्व बँकेचा कार्यकारी नफा ४१.७ टक्क्यांनी वधारला आहे. तो १,११९.१४ कोटी रुपयांवरून १,५८५.६९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. याबरोबरच सरलेल्या तिमाहीत बँकेचे एकूण अनुत्पादक मालमत्ता ३.३७ टक्क्यांनी कमी होऊन ६,२९३.८६ कोटींवर मर्यादित आहेत. डिसेंबर तिमाहीत निव्वळ बुडीत कर्ज अनुक्रमे ८.७६ टक्क्यांनी घसरून १,४०६.४४ कोटींवरून १,२८३.१३ कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. ३१ डिसेंबर २०२४ अखेर यूको बँकेची व्यावसायिक उलाढाल ४,८८,९११ कोटी रुपयांवर पोहोचली आहे, ज्यात वार्षिक १२.२८ टक्के वाढ झाली आहे.

Budhaditya rajyog in scorpio
‘या’ ३ राशी कमावणार बक्कळ पैसा; मंगळाच्या राशीतील बुधादित्य राजयोग देणार पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
70% of BSE500 stocks are in a bear phase; investors consider buying the dip before Union Budget 2025.
BSE500 मधील ७० टक्के शेअर्स मंदीच्या टप्प्यात, अर्थसंकल्पापूर्वी गुंतवणूक करणे योग्य ठरणार का?
On Republic Day Dr ravindra singhal and others were awarded Presidents Medal for Distinguished Service
रवींद्र सिंगल, दत्तात्रय कराळे यांना राष्ट्रपती पदक, महाराष्ट्र पोलीस दलाला एकूण ४३ पदके
Saturn Ketu Shadashtak Yoga
शनी-केतू देणार पैसाच पैसा; षडाष्टक योगाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींचे नशीब फळफळणार
Today’s Horoscope 25 January 2025
Horoscope Today: षटतिला एकादशीला १२ राशींच्या मनोकामना विष्णू कृपेने होणार का पूर्ण? कोणाला लाभ तर कोणासाठी नवीन संधी ठोठावेल दार!
Budh Nakshatra Parivartan 2024
पैसाच पैसा! बुधाच्या अनुराधा नक्षत्रातील प्रवेशाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य
elon musk danger for world
इलॉन मस्क नावाचा धोका
Story img Loader