वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केल्याने रिझर्व्ह बँकेकडून असे पाऊल उचलले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक ७ ऑक्टोबरला होणार आहे. मात्र या समितीतील तीन बाह्य सदस्यांची मुदत त्याआधीच संपुष्टात येत आहे. यामुळे या बैठकीत व्याजदर कपातीचा निर्णय होण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
bmc to rehabilitate fisherwomen in tardeo
मासळी विक्रेत्या महिलांचे पुनर्वसन होणार ? पालिका अधिकाऱ्यांची मासळी विक्रेत्या महिलांसह बैठकीत चर्चा
Vanchit Bahujan Aaghadi Maharashtra Assembly Election Results 2024
वंचितही ईव्हीएमविरोधात आक्रमक, थेट निवडणूक आयोगाला पत्र; विचारले ‘हे’ तीन प्रश्न

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीमध्ये बाह्य सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या सदस्यांची निवड करणाऱ्या सरकार नियुक्त समितीनेही यावर भाष्य केलेले नाही. फेडरल रिझर्व्हकडून दरकपात झाल्याने पतधोरण समितीच्या आगामी बैठकीत व्याजदर कपातीबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असले तरी बैठकीच्या आधी समितीतील सदस्यांचा कालावधी संपुष्टात येत असल्याने व्याजदर कपातीचा निर्णय होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

Aakriti Chopra Resings Zomato : झोमॅटोच्या सहसंस्थापक आकृती 

याआधी २०२० मध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्या वेळी पतधोरण समितीतील नवीन सदस्यांची निवड वेळेत होऊ शकली नव्हती. त्यामुळे बँकेला व्याजदर कपातीचा निर्णय पुढे ढकलावा लागला होता. पतधोरण समितीत तीन बाह्य सदस्यांचा समावेश असतो. त्यात शिक्षण आणि वित्तीय क्षेत्रातील अर्थतज्ज्ञांचा समावेश असतो. याचबरोबर समितीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर आणि बँकेचा आणखी एक अधिकारी अशा तिघांचा समावेश असतो.

रिझर्व्ह बँकेचे नेतृत्व कोण करणार?

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ ९ डिसेंबरला पूर्ण होत आहे. याच वेळी बँकेचे डेप्युटी गव्हर्नर मायकेल पात्रा यांचा कार्यकाळ १४ जानेवारीला संपुष्टात येत आहे. या दोघांना मुदतवाढ देण्याबाबत सरकारसोबत रिझर्व्ह बँकेनेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे पुढील काळात रिझर्व्ह बँकेचे नेतृत्व कोणाकडे जाणार याबाबत उत्सुकता आहे.

Story img Loader