सर्व ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये आणि गुंतवणुकीत नामनिर्देशित व्यक्तींची नोंदणी केली पाहिजे, जेणेकरून दावा न केलेल्या रकमेची समस्या सोडवता येईल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मंगळवारी बँका आणि वित्तीय संस्थांना हे सुनिश्चित करण्यास सांगितले.
ग्लोबल फिनटेक फेस्टला संबोधित करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण बोलत होत्या, त्या म्हणाल्या की, मी बँकिंग प्रणाली, वित्तीय परिसंस्था (म्युच्युअल फंड आणि शेअर बाजार) आणि सार्वजनिक पैशांचा व्यवहार करणाऱ्या सर्व संस्थांना सांगू इच्छिते की, प्रत्येकाने भविष्याची काळजी घेतली पाहिजे. तसेच त्यांच्या ग्राहकाने त्यांच्या नॉमिनीचे नाव आणि पत्ता नोंदवला आहे की नाही याची खात्री केली पाहिजे, असंही त्यांनी सांगितले.
हेही वाचाः Money Mantra : प्राप्तिकर विभागाकडून अलर्ट जारी, ITR रिफंड अद्याप मिळालेला नाही? मग करा ‘हे’ काम
देशात Unclaimed Money किती?
एका अहवालानुसार, देशात १ लाख कोटींहून अधिकचा दावा न केलेला पैसा आहे आणि त्यापैकी ३५ हजार कोटींहून अधिक रक्कम बँकिंग व्यवस्थेत जमा आहे. पुढे अर्थमंत्री म्हणाल्या की, आपण देशात एक जबाबदार आर्थिक परिसंस्था निर्माण करणे खूप महत्त्वाचे आहे आणि ही एक कमतरता संपूर्ण व्यवस्थेत व्यत्यय आणू शकते.
हेही वाचाः वडिलांचा हजारो कोटींचा व्यवसाय नाकारला, अन् स्वबळावर उभारली १५० कोटींची कंपनी; कोण आहेत सिमरन लाल?
फिनटेक कंपन्यांनी सायबर सुरक्षेत गुंतवणूक करावी
याबरोबरच त्यांनी फिनटेक कंपन्यांना सायबर सुरक्षेत गुंतवणूक करण्यास सांगितले, कारण ग्राहकांचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे. थोडक्यात कंपनीच्या शेअरची किंमत फुगवण्यासाठी करमुक्त छावण्यांमधून (टॅक्स हेव्हन) गुंतवणूक आणणे. सामान्यतः कंपनीच्या प्रवर्तक गटांकडूनच ही गुंतवणूक केली जाते. विशेष म्हणजे हा कोणत्याही चांगल्या आर्थिक व्यवस्थेसाठी धोका आहे.
आरबीआयही प्रयत्न करत आहे
RBI च्या वतीने दावा न केलेल्या ठेवींचा निपटारा करण्यासाठी बँकांना दावा न केलेल्या ठेवी आणि निष्क्रिय खात्यांची यादी प्रकाशित करण्यास सांगितले होते. यासाठी आरबीआयने UDGAM पोर्टलही सुरू केले आहे, याद्वारे तुम्ही दावा न केलेली रक्कम शोधू शकता.