नवी दिल्ली : सोने व चांदीच्या दागिन्यांच्या घडणावळीत आवश्यक सुटे भाग आणि नाण्यांच्या आयात शुल्कात सरकारने मंगळवारी वाढ केली. त्यामुळे हे आयात शुल्क आता १० टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर पोहोचले आहे. यामुळे आगामी काळात सोने, चांदीचे दागिने महागणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्रालयाने सोने व चांदीच्या दागिन्यांचे सुटे भाग आणि नाण्यांचे आयात शुल्क १५ टक्के करण्याचा निर्णय घेतला असून, त्यात आधारभूत सीमा शुल्क १० टक्के आणि कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर ५ टक्के यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> आयपीओ बाजारात उत्साह कायम; नोव्हा ॲग्रीटेकच्या ‘आयपीओ’साठी पहिल्याच दिवशी १० पट भरणा

सोने व चांदीच्या सुट्या भागांमध्ये हूक, पिन, स्क्रू आदी दागिन्यांच्या घडणीतील आवश्यक गोष्टींचा समावेश होतो. मौल्यवान धातूंतील या घटकांना समाज कल्याण अधिभारातून सवलत प्राप्त आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने मौल्यवान धातूंच्या वापरलेल्या उत्प्रेरकांवरील आयात शुल्कातही वाढ केली आहे. यावरील आयात शुल्क १४.३५ टक्के करण्यात आले आहे. त्यात आधारभूत सीमा शुल्क १० टक्के आणि कृषी पायाभूत सुविधा उपकर ४.३५ टक्के यांचा समावेश आहे. अर्थमंत्रालयाने वाढीव आयात शुल्काची अंमलबजावणी २२ जानेवारीपासून सुरू केली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union finance ministry increase import duty by 15 percent on gold print eco news zws