Upcoming IPO in 2025 : येत्या काही दिवसांतच नव्या वर्षाला सुरुवात होणार असून, गुंतवणूकदार २०२५ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण सेबीने ३५ कंपन्यांना आयोपीओ साठी हिरवा कंदिला दाखवला आहे. तर आणखी ५५ कंपन्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि ब्रिगेड एंटरप्रायझेस यांसारख्या प्रमुख कंपन्याही त्यांच्या उपकंपन्यांचा आयपीओ आणण्यासाठी तयारी करत आहेत. यामध्ये रिलायन्स जिओचा आयोपीओ भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ असू शकतो. त्याचप्रमाणे, एचडीबी फायनान्सिएल सर्व्हिसेस आणि ग्रीव्हज इलेक्ट्रिक मोबिलिटी आयपीओ आणण्यासाठी सज्ज आहेत.

२०२५ मध्ये शेअर बाजारात येणारे आयपीओ

एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
amazon 15 minutes delivery
ॲमेझॉन आता ब्लिंकइट, झेप्टोला टक्कर देणार, १५ मिनिटांत वस्तू घरपोच मिळणार; कंपन्या क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक का?
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Best Web Series of 2024
२०२४ मधील गाजलेल्या वेब सीरिजची यादी, तुम्ही पाहिल्यात का ‘या’ कलाकृती?

देशभरातील गुंतवणूकदार २०२५ मध्ये येणाऱ्या एलजी कंपनीच्या आयपीओची आतुरतेने वाट पाहत आहेत. दक्षिण कोरियाच्या या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने इश्यूद्वारे १०.१ कोटी शेअर्सच्या ऑफर-फॉर-सेल द्वारे १५,२३७ कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे.

हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज

आयटी कंपनी असलेल्या हेक्सावेअर टेक्नॉलॉजीजचा ९,९५० कोटी रुपयांचा आयपीओ येणार आहे. दरम्यान ही या क्षेत्रातील २० वर्षांमधील सर्वात मोठी आयपीओ ऑफर असणार आहे.

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL)

भारतातील सर्वात मोठी डिपॉझिटरी असलेल्या एनएसएलडीने ऑफर फॉर सेलद्वार तीन हजार कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यांचा आयपीओ २०२५ च्या सुरुवातीला बाजारात येण्याची शक्यता आहे.

झेप्टो

झोमॅटो आणि स्वीगीनंतर झेप्टो ही ई कॉमर्स कंपनीही शेअर बाजारात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी १ अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त निधी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

फ्लिपकार्ट

ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेली, फ्लिपकार्ट २०२५ च्या शेवटी किंवा २०२६ च्या सुरुवातीस आपला आयपीओ बाजारात आणण्याची शक्यता आहे.

एथर एनर्जी

ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीने २०२४ मध्ये भारतीय शेअर बाजारात पदार्पण केल्यानंतर, आणखी एक ईव्ही कंपनी बाजारात येण्यासाठी सज्ज आहे. एथर एनर्जीने नवीन इश्यू आणि ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून ४५०० कोटींचा निधी उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

हे ही वाचा : सोने गुंतवणूकदारांची चांदी, २०२४ मध्ये मिळवला २७ टक्के परतावा; भविष्यातही सोने चकाकणार

जेएसडब्ल्यू सिमेंट

सिमेंट उद्योगातील प्रमुख कंपनी असलेली, जेएसडब्ल्यू सिमेंट कर्ज कमी करण्यासाठी आणि आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी ४ हजार कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. माहितीनुसार जानेवारी २०२५ मध्ये त्यांचा आयपीओ बाजारात येणे अपेक्षित आहे.

टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी

टाटा मोटर्सची उपकंपनी असलेली टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी त्यांचा ईव्ही क्षेत्रातील पाय भक्कम करण्यासठी आयपीओ लाँच करण्याची योजना आखत आहे.

Story img Loader