नवी दिल्ली : Unemployment rate in urban areas declines देशातील शहरी बेरोजगारीचा दर आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीअखेर ६.६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, असे १६ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या सरकारी सर्वेक्षणाने स्पष्ट केले. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा दर ६.७ टक्के होता.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केलेल्या नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षणानुसार, बेरोजगारीचा दर मागील वर्षाच्या तुलनेत नाममात्र फरकाने अपरिवर्तित राहिला आहे. त्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर ८.२ टक्के नोंदवण्यात आला होता. पुरुषांमधील बेरोजगारी मागील तिमाहीतील ६.१ टक्क्यांच्या तुलनेत, यंदाच्या एप्रिल ते जून तिमाहीत ५.८ टक्क्यांपर्यंत नरमली आहे.
हेही वाचा >>> Gold-Silver Price: स्वस्त झालेले सोने पुन्हा महागले; मुंबई-पुण्यातील १० ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या…
महिला बेरोजगारी वाढली महिलांमधील बेरोजगारीचा दर या सरलेल्या जून तिमाहीत वाढून ९ टक्के असा चार तिमाहीतील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. महिलांसाठी श्रमशक्तीचा सहभाग दर देखील मागील महिन्यात २५.२ टक्क्यांवर पोहोचला आहे. जो सरलेल्या तिमाहीत २५.६ टक्के राहिला होता. मात्र त्याआधीच्या सलग तीन तिमाहीत तो २५ टक्क्यांपुढे राहिला आहे.