मुंबईः गेल्या सहा वर्षांत शहरी महिलांच्या रोजगारात १० टक्क्यांनी वाढ झाली असून, २०२३-२४ मध्ये महिलांचा श्रमिकांमधील सहभाग २८ टक्क्यांवर पोहचला आहे. तथापि २० ते २४ वयोगटातील तरुण महिलांमधील बेरोजगारीचे प्रमाण याकाळात १० टक्क्यांवरून ७.५ टक्के असे घसरले असून, त्यापेक्षा तरुण पुरुष बेरोजगारीचे प्रमाण जास्त असणे हा नवीन चिंताजनक पैलू पुढे आला असल्याचे एका पाहणी अहवालाने शुक्रवारी स्पष्ट केले.
चेन्नईच्या ग्रेट लेक्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने प्रसिद्ध केलेल्या अहवालाने भारतातील शहरी महिलांना रोजगाराच्या विकसित होत असलेल्या संधींवर प्रकाश टाकला आहे. मात्र शिक्षित महिलांच्या कौशल्य व शैक्षणिक दर्जाला साजेशा नसलेल्या हलक्या नोकऱ्या आणि एकूण रोजगार निर्मितीची गती देखील अपेक्षेप्रमाणे नसल्याने नव्याने उभ्या राहणाऱ्या गंभीर सामाजिक आव्हानांचा इशारा देखील अहवालाने दिला आहे.
सामाजिक नियमांनुसार कुटुंबातील पुरुष हा कमावता असावा लागतो. तथापि रोजगार निर्मितीतील अपुरी वाढ आणि नव्याने निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये महिलांना सामावून घेण्याचा वाढता कल पाहता, पुरुष बेरोजगारीतही व्यस्त प्रमाणात वाढ होत आहे. यातून पुढे अनेक भयंकर सामाजिक परिणाम संभवतात.
अहवालावर भाष्य करताना, ग्रेट लेक्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका डॉ. विद्या महांबरे म्हणाल्या, शहरी महिलांचा कामगार वर्गात सहभाग वाढत असला तरी, कमाई, करिअरमध्ये वाढ आणि घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये अद्याप खऱ्या अर्थाने लिंगभाव समानता त्यायोगे प्रतिबिंबीत होताना दिसून येत नाही. खरा बदल घडून येण्यासाठी, प्रथम आपल्याला सर्वांसाठी अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा