जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) बैठकीत अमेरिका, चीन, कोरिया आणि चायनीज तैपेईने लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर आयात बंदी लादण्याच्या भारताच्या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. WTO च्या मार्केट ऍक्सेस कमिटीच्या बैठकीत ही चिंता अधोरेखित करण्यात आली.

अमेरिका काय म्हणाली?

या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर भारतातील अमेरिकन निर्यातीसह या उत्पादनांच्या व्यापारावर परिणाम होणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेने असेही म्हटले आहे की, या निर्णयामुळे निर्यातदार आणि वापरकर्त्यांसाठी अनिश्चितता निर्माण होत आहे.

हेही वाचाः कर्जाशी संबंधित मोठा नियम बदलणार अन् कर्जदारांना थेट फायदा मिळणार, मनमानी केल्यास बँकेला ग्राहकांना द्यावे लागणार ‘इतके’ रुपये

भारताने ऑगस्टमध्ये आयातीवर बंदी घातली होती

३ ऑगस्ट रोजी भारताने लॅपटॉप, वैयक्तिक संगणक (टॅब्लेट संगणकांसह), मायक्रो कॉम्प्युटर, मोठे किंवा मेनफ्रेम संगणक आणि काही डेटा प्रोसेसिंग मशीन्स यांसारख्या अनेक आयटी हार्डवेअर उत्पादनांवर देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आयात कमी करण्याच्या उद्देशाने बंदी घातली होती. चीन सारख्या देशातून आयात मोठ्या प्रमाणात वाढत होती. त्यामुळेच निर्णय १ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.

हेही वाचाः Money Mantra : तुमच्या आधार कार्डमध्ये आता कोणीही छेडछाड करू शकणार नाही; फक्त एका मेसेजने त्वरित लॉक होणार

…म्हणून परवाना घेणे आवश्यक नाही

अलीकडेच वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी सांगितले होते की, भारत आयातीवर परवान्याची आवश्यकता लादणार नाही, परंतु केवळ त्यांच्या येणाऱ्या शिपमेंटवर लक्ष ठेवेल.

कोरियाने भारताला पुनर्विचार करण्याची विनंती केली

भारताने लादलेल्या बंदीमुळे अनावश्यक व्यापार अडथळे निर्माण होऊ शकतात, यावर कोरियाने भर दिला. कोरियाने भारताला निर्बंधांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे आणि त्याच्या अंमलबजावणीच्या कालमर्यादेसह या विषयावर तपशीलवार स्पष्टीकरण आणि माहिती दिली आहे.

आर्थिक वर्ष २३ मध्ये आयात ५ अब्ज डॉलर्सच्या वर होती

भारताने गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे २०२२-२३ मध्ये ५.३३ अब्ज डॉलर किमतीच्या लॅपटॉपसह वैयक्तिक संगणक आयात केले आहेत, तर त्याच्या एक वर्ष आधी म्हणजे २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताने ७.३७ अब्ज डॉलर किमतीची आयात केली आहे.

Story img Loader