तामिळनाडूतील थुथूकुडीस्थित तांबे शुद्धीकरण प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नांना मोडता घालत अब्जाधीश उद्योगपती अनिल अगरवाल यांनी त्यांच्या मालकीचा हा प्रकल्प अखेर विकून टाकण्याचे संकेत दिले आहेत. हा प्रकल्प ४,५०० कोटी रुपयांना विकण्याच्या पर्यायावर कंपनी विचार करीत आहे. वेदान्ता समूहाने याबाबत इच्छुक कंपन्यांकडून इरादापत्रही मागविले असल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील वर्षी जून महिन्यात हे इरादापत्र मागविण्यात आले होते; परंतु त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळू शकला नाही. वेदान्ताच्या या तांबे प्रकल्पाला (स्टरलाइट कॉपर) स्थानिकांकडून कडवा विरोध झाला होता. तामिळनाडू प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार हा प्रकल्प २०१८ सालात बंद करण्यात आला होता. तो पुन्हा सुरू करण्यासाठी हा समूह प्रयत्नशील होता. आता मात्र या प्रकल्पाची विक्री करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचाः अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर, बँकेने सुरू केली नवी सेवा; तुम्हालाही फायदा होणार

वेदान्ता समूहाने पुन्हा १२ जूनला हा प्रकल्पाची विक्री करण्याबाबत इच्छुक कंपन्यांकडून अर्ज मागविले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर समूहाने हे पाऊल उचलले आहे. प्रकल्प बंद करण्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाविरोधात वेदान्ताने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात या प्रकरणी कंपनीच्या बाजूने निकाल दिला होता.

हेही वाचाः बँकांच्या ‘या’ स्पेशल एफडीमध्ये ८ टक्क्यांपर्यंत व्याज; कोणत्या योजनेची अंतिम मुदत कधी संपणार?

कर्जफेडीसाठी पाऊल

वेदान्ता समूहाने कर्जफेडीसाठी या बंद स्थितीत असलेल्या तांबे शुद्धीकरण प्रकल्पाची विक्री करण्याचे पाऊल उचलले आहे. प्रकल्पाच्या विक्रीतून प्रचंड मोठा असलेला कर्जभार हलका करण्यासह समूहाला भांडवली खर्चासाठी निधी उपलब्ध होऊ शकेल. समूहाने यंदा १.७ अब्ज डॉलर भांडवली खर्चाची योजना आखली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vedanta plans to sell copper refining plant in tamil nadu vrd
Show comments