पीटीआय, गांधीनगर : वेदांता कंपनीसोबतच्या संयुक्त भागीदारीतील २० अब्ज डॉलरच्या सेमीकंडक्टर प्रकल्पातून फॉक्सकॉनने माघार घेतली आहे. यानंतर आता वेदांताचे प्रमुख अनिल अगरवाल यांनी कंपनीचा चिप उत्पादन प्रकल्पाचा पहिला टप्पा अडीच वर्षांत सुरू होईल, असे जाहीर केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वार्षिक सेमीकंडक्टर परिषदेत अगरवाल यांनी ही घोषणा केली. वेदांता आणि तैवानमधील फॉक्सकॉन यांच्याकडून चिप उत्पादनाचा प्रकल्प गुजरातमध्ये उभारला जाणार होता. नंतर फॉक्सकॉनने या प्रकल्पातून माघार घेतली आहे. यानंतरही प्रकल्प उभारण्याचा निर्धार वेदांताने केला आहे. अगरवाल यांनी प्रकल्पाचा पहिला टप्पा अडीच वर्षात तयार होईल, असे जाहीर केले. वेदांताने नवीन भागीदारांचा शोध सुरू केला असून, याच वर्षी प्रकल्पाला सुरूवात होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> भारतीय कंपन्या परदेशात थेट सूचिबद्ध होणार; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

भारताकडून जगभरातील चिप उत्पादक कंपन्यांना देशात उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी आमंत्रित केले जात आहे. महागड्या चिपच्या आयातीवरीवल आणि तैवान व चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. देशात चिप उत्पादन प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या कंपन्यांना १० अब्ज डॉलरच्या सवलती सरकारने दिल्या आहेत. भारतातील चिप बाजारपेठ २०२६ पर्यंत ६४ अब्ज डॉलरवर पोहोचण्याचा अंदाज आहे.

एएमडी ४० कोटी डॉलर गुंतविणार

अमेरिकेतील चिप उत्पादक कंपनी अॅडव्हान्स्ड मायक्रो डिव्हायसेस (एएमडी) भारतात पुढील पाच वर्षांत ४० कोटी डॉलरची गुंतवणूक करणार आहे. कंपनी बंगळुरूमध्ये अत्याधुनिक रचना केंद्र उभारणार आहे. एएमडीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मार्क पेपरमास्टर यांनी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत परिषदेत ही घोषणा केली.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vedanta to set up chip manufacturing plant announcement by company heads print eco news ysh
Show comments