मुंबई : अवजड अभियांत्रिकी उद्योगांना स्टील पाईप आणि ट्यूबचे वितरण करणारी ‘विभोर स्टील ट्यूब लिमिटेड’च्या समभागांनी मंगळवारी शेअर बाजारात पदार्पणालाच दमदार १८१ टक्क्य़ांच्या अधिमूल्यासह मुसंडी मारली. चालू वर्षातील ‘आयपीओ’पश्चात सर्वोत्तम सूचिबद्धता लाभ देणारी ही कंपनी ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Stock Market Today : निर्देशांकांची उच्चांकी दौड कायम;निफ्टी २२,२०० पुढील पातळीवर टिकून

विभोर स्टील ट्यूबचे समभाग गुंतवणूकदारांना प्रत्येकी १५१ रुपये किमतीला वितरित केले गेले. त्या बदल्यात गुरुवारी मुंबई शेअर बाजारात या समभागांनी ४२५ रुपये पातळीवर प्रारंभिक व्यवहार झाला तर राष्ट्रीय शेअर बाजारात त्याने ४२१ रुपयांवर व्यवहाराला सुरुवात केली. समभागाने मुंबई शेअर बाजारात ४४२ रुपयांचा उच्चांकही अल्पावधीत दाखविला. एनएसईवरही समभागाने ४४६.२५ रुपयांचा उच्चांक गाठला. विभोर स्टील ट्यूबने समभाग विक्रीतून ७२ कोटी रुपयांचे भांडवल या भागविक्रीतून उभारले.

हेही वाचा >>> Gold-Silver Price on 20 February 2024: सोन्या-चांदीच्या दरात बदल! खरेदीआधी तपासा आजचे भाव

या भागविक्रीला गुंतवणूकदारांनी ३२० पटीने अधिक भरणा करून उमदा प्रतिसाद दिला. गुरुवारी बाजाराचे व्यवहार थंडावले तेव्हा ‘विभोर स्टील ट्यूब’चा समभाग बीएसईवर २९१ रुपयांची (तब्बल १९२.७२ टक्के) वाढ दर्शवीत ४४२ रुपयांवर स्थिरावला. विभोर स्टील ट्यूबचा आयपीओ १३ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान विक्रीला खुला होता. त्यासाठी कंपनीने १४१ ते १५१ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला होता. कंपनी भारतातील विविध जड अभियांत्रिकी उद्योगांना स्टील पाईप आणि ट्यूबचे उत्पादन, निर्यात आणि पुरवठा करते. समभाग विक्रीपूर्वी कंपनीच्या प्रवर्तकांकडे ९८.२४ टक्के भागभांडवली हिस्सेदारी होती.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vibhor steel tubes make bumper debuts at a premium of 181 percent over issue price print eco news zws
Show comments