मुंबई : पेटीएमची पालक कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्सचे प्रमुख विजयशेखर शर्मा यांनी कंपनीतील १०.३० टक्के हिस्सा चीनच्या अलिबाबा समूहातील ॲन्ट फायनान्शियलकडून विकत घेण्याचे पाऊल उचलले आहे. त्या परिणामी कंपनीच्या समभागाने सोमवारी मुंबई शेअर बाजारात ११.६ टक्क्यांची उसळी घेऊन ८८७ रुपयांची पातळी गाठली. दिवसअखेर ६.८ टक्क्यांच्या कमाईसह समभाग ८५०.७० रुपये पातळीवर स्थिरावला.

हेही वाचा >>> टेक्नोग्रीन सोल्यूशन्सचा विस्तार योजनेसाठी ‘आयपीओ’चा प्रस्ताव

amazon 15 minutes delivery
ॲमेझॉन आता ब्लिंकइट, झेप्टोला टक्कर देणार, १५ मिनिटांत वस्तू घरपोच मिळणार; कंपन्या क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक का?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
hindustan coca cola beverages
ज्युबिलंट भारतीय समूहाची हिंदुस्तान कोका-कोला बीव्हरेजेसमध्ये ४० टक्के हिस्सेदारी
t Plus zero transaction system
आघाडीच्या ५०० कंपन्यांमध्ये ३१ डिसेंबरपासून ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणाली
nomura company
‘Nomura’ कंपनीच्या सीईओने केली स्वतःच्या पगारात कपात; कारण काय? ही कंपनी वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची कारणं काय?
nepal prime minister kp oli visit china importance in perspective on Belt and Road
पंतप्रधानपद पणाला लावून चीनशी सहकार्य!
mishtann food limited
मिष्टान्न! (पूर्वार्ध)
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’

वन ९७ कम्युनिकेशन्सचे शर्मा हे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. शर्मा हे त्यांच्या मालकीच्या रिझिलियंट ॲसेट मॅनेजमेंट कंपनीमार्फत पेटीएममधील १०.३० टक्के अतिरिक्त हिस्सा ॲन्ट फायनान्शियलकडून खरेदी करणार आहेत. याबाबतचा करार झाला असून, यानंतर पेटीएमच्या मालकी रचनेत बदल होऊन त्याचा फायदा कंपनीला होणार आहे. या व्यवहारानंतर शर्मा यांचा पेटीएममधील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हिस्सा १९.४२ टक्क्यांवर जाईल आणि ॲन्ट फायनान्शियलचा हिस्सा १३.५ टक्क्यांपर्यंत खाली येईल. रिझिलियंट ॲसेट मॅनेजमेंट ही शर्मा यांच्या १०० टक्के मालकीची परदेशी कंपनी आहे. हा व्यवहार सध्याच्या बाजारभावानुसार लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. त्यासाठी ४ ऑगस्टचा भाव गृहीत धरला जाईल. त्यानुसार १०.३० टक्के हिस्सा ६२.८ कोटी डॉलरला (सुमारे ५,१७० कोटी रुपये) खरेदी केला जाईल. या व्यवहारामुळे रिझिलियंटला मालकी तसेच मतदानाचे हक्क मिळणार आहेत.

Story img Loader