पुणे: पुण्यात मुख्यालय असलेल्या विन्सिस आयटी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या कंपनीची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या १ ऑगस्टपासून खुली होत आहे. कंपनीने प्रति समभाग १२१ रुपये ते १२८ रुपये किंमतपट्टा निश्चित केला असून, या माध्यमातून ४९.८४ कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा तिचा मानस आहे.
हेही वाचा >>> भारताच्या तांदूळ निर्यातबंदीने जागतिक महागाईत भर’,आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा भारताला इशारा; बंदी मागे घेण्याची मागणी
विन्सिस आयटी सर्व्हिसेस ही माहिती-तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर आणि सॉफ्टवेअर सेवा कंपनी आहे. बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेले ३८.९ लाख समभाग विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याची कंपनीची योजना आहे. ही समभाग विक्री ४ ऑगस्टपर्यंत सुरू राहील. तत्पश्चात कंपनीचे समभाग ‘एनएसई इमर्ज’ या लघू व मध्यम कंपन्यांसाठी स्थापित बाजारमंचावर सूचिबद्ध होतील. खेळत्या भांडवलाची आवश्यकता, उपकंपन्यांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी या ‘आयपीओ’मधून उभारल्या जाणाऱ्या निधीचा वापर करण्यात येणार आहे.