जागतिक सायबर सुरक्षा उपाय प्रदाता Quick Heal Technologies Ltd ने विशाल साळवी यांची नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. Infosys चे माजी कार्यकारी अधिकारी विशाल साळवी यांना भारत आणि जागतिक स्तरावर सायबर सुरक्षा आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात २९ वर्षांचा अनुभव आहे. क्विक हील टेक्नॉलॉजीजमध्ये सामील होण्यापूर्वी साळवी यांनी ग्लोबल चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर आणि सायबर सिक्युरिटी सर्व्हिस लाइनचे बिझनेस हेड आणि इन्फोसिस लिमिटेडमध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष या पदांवर काम केले आहे.
‘या’ मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले
“साळवी यांनी सायबर सुरक्षा आणि माहिती तंत्रज्ञानातील कौशल्याच्या जोरावर PwC, HDFC बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, ग्लोबल ट्रस्ट बँक, डेव्हलपमेंट क्रेडिट बँक आणि क्रॉम्प्टन ग्रीव्हज यांसारख्या संस्थांसोबत काम केले आहे. क्विक हीलचे अध्यक्ष कैलास काटकर आता एमडीच्या भूमिकेत राहतील, असंही क्विक हीलने एका निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचाः डॉक्टरकीचे स्वप्न सोडून अरविंद स्वामी बनले अभिनेते, आज सांभाळतायत ३३०० कोटींचा व्यवसाय
सायबर सुरक्षा इकोसिस्टम मजबूत करणार
“आमच्या टीमने मजबूत सायबर सुरक्षा उपाय वितरीत करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत आणि सर्व भागधारकांसाठी आम्ही तयार केलेल्या महत्त्वपूर्ण व्यावसायिक मूल्याचा मला खूप अभिमान आहे. विशाल साळवी हे आमचे सीईओ म्हणून काम पाहतील, आम्ही भारतातील सायबर सुरक्षा परिसंस्थेमध्ये परिवर्तन करण्यासाठी आणि जागतिक नकाशावर आमचे स्थान मजबूत करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत,” असंही कैलास काटकर म्हणालेत.