मुंबईः  सुमारे १० वर्षे जुन्या ‘विस्तारा’चे सोमवारी रात्री उशिरा स्वतंत्र हवाई सेवा म्हणून अस्तित्व संपुष्टात आले असून, तिचे एअर-इंडियामध्ये विलीनीकरण पूर्णत्वाला गेले आहे. विशेष म्हणजे, ९ जानेवारी २०१५ रोजी जेव्हा विस्ताराने कार्यान्वयन सुरू केले तेव्हा तिचे पहिले उड्डाण दिल्ली ते मुंबई हे होते. सोमवारी रात्री उलट दिशेने म्हणजे मुंबई ते दिल्ली अशा विस्ताराच्या यूके ९८६ विमानाने शेवटचे उड्डाण पूर्ण केले. सिंगापूर एअरलाइन्स आणि टाटा सन्स यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘विस्तारा’ या हवाई सेवेचे टाटा समूहाने मालकी मिळविलेल्या एअर इंडियामध्ये विलीनीकरण मंगळवारी पूर्णत्वाला गेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> रुपयाचे ८-१० टक्क्यांपर्यंत अवमूल्यनाचा अंदाज; सलग चौथ्या सत्रात घसरण; रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपाने मोठे नुकसान टळले

विलीनीकरणापश्चात हवाई सेवेचे ‘विस्तारा’ हे नामाभिधान लोप पावणार असून, ती एअर इंडियाच्या सेवेचा भाग बनेल. यासह तिचा उड्डाण संकेतांक ‘यूके’ देखील इतिहासजमा होणार असून, मंगळवारपासून तिच्या उ्डाडणांना ‘एआय२एक्सएक्सएक्स’ हा नवीन संकेतांक लागू होईल.
विलीनीकरणानंतर स्थापित होणाऱ्या नवीन संयुक्त कंपनीमध्ये सिंगापूर एअरलाइन्सची २५.१ टक्के हिस्सेदारी राहील. विलीनीकरणाआधी ‘विस्तारा’च्या कर्मचाऱ्यांना एअर इंडियाच्या सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया गेल्या वर्षापासूनच सुरू करण्यात आली होती.