मुंबई: सौरऊर्जेशी निगडित उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या वारी एनर्जीज् लिमिटेडची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या २१ ऑक्टोबरला सुरू होणार आहे. पुढील तीन दिवस म्हणजे २३ ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूकदारांना या समभाग विक्रीत सहभागी होता येईल. तर सुकाणू गुंतवणूकदारांना १८ ऑक्टोबरला बोली लावता येईल.

या माध्यमातून ४,३२१ कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना असून, समभाग विक्रीसाठी १,४२७ रुपये ते १,५०३ रुपये असा किंमतपट्टा निश्चित केला आहे. कंपनीचे प्रवर्तक आणि विद्यमान भागधारक त्यांच्या हिस्सेदारीतील आंशिक वाटा असे सुमारे ४८ लाख समभागांची यातून विक्री करणार आहेत. तर ३,६०० कोटी रुपये मूल्याच्या नवीन समभागांची विक्री करण्यात येईल.

oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
petrol diesel price today in marathi
Price of Petrol And Diesel : पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? तुमच्या शहरातील आजचे दर येथे चेक करा
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या

हेही वाचा >>>‘महाबँके’ला १,३२७ कोटींचा तिमाही नफा

वारी एनर्जीज् लिमिटेडच्या प्रारंभिक समभाग विक्रीमध्ये ५० टक्के समभाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तर गैर-संस्थात्मक संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी १५ टक्के आणि ३५ टक्के समभाग किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असतील. कंपनीचे समभागांची मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) २८ ऑक्टोबरला सूचिबद्धता अपेक्षित आहे. गुंतवणूकदारांना किमान नऊ समभागांसाठी आणि नऊ समभागांच्या पटीत आयपीओसाठी अर्ज करता येईल.

डिसेंबर १९९० मध्ये स्थापन झालेली वारी एनर्जी लिमिटेड ही कंपनी सौरऊर्जा निर्मितीसाठी उपयुक्त सुटे घटक बनवते. सौरऊर्जा निर्मितीतील वर्गीकरणामध्ये मल्टीक्रिस्टलाइन मॉड्यूल्स, मोनोक्रिस्टलाइन मॉड्यूल्स आणि टॉपकॉन मॉड्यूल्सचा समावेश आहे, ज्यामध्ये फ्रेम केलेल्या आणि अनफ्रेम केलेल्या दोन्ही प्रकारच्या लवचीक बायफेशियल मॉड्यूल्स तसेच बिल्डिंग-इंटिग्रेटेड फोटोव्होल्टेक मॉड्यूल असतात.