Parag Desai Success Story : देशातील आघाडीच्या चहा कंपन्यांपैकी एक असलेल्या वाघ बकरी चहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे निधन झाले आहे. अहमदाबाद मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, ४९ वर्षीय पराग गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. यादरम्यान भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात ते घसरले अन् तोल जाऊन पडले, त्यात त्यांना ब्रेन हॅमरेज झाला. त्यांच्यावर अहमदाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पराग देसाई हे वाघ बकरी टी ग्रुपमधील चौथ्या पिढीतील उद्योजक होते. समूहाला देशातील पहिल्या तीन चहा कंपन्यांमध्ये मानाचे स्थान मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. १९९५ मध्ये जेव्हा ते कंपनीत रुजू झाले, तेव्हा तिची किंमत सुमारे १०० कोटी रुपये होती. आज कंपनीचा व्यवसाय सुमारे २ हजार कोटी रुपयांचा आहे. कंपनीचा व्यवसाय देशातील २४ राज्ये आणि जगातील ६० देशांमध्ये पसरलेला आहे.

पराग देसाई हे वाघ बकरी चहा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रसेश देसाई यांचे पुत्र होते. देसाई यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील लाँग आयलँड विद्यापीठातून एमबीए केले. त्यांना ३० वर्षांपेक्षा जास्त व्यवसायाचा अनुभव होता. ते चहाचे आस्वादक होते आणि वाघ बकरी चहा ग्रुपचा आंतरराष्ट्रीय व्यवसायही ते पाहत होते. पराग देसाई यांनी चहाच्या व्यवसायात धोरणात्मक बदल घडवून आणले आणि भारतभर ७० हून अधिक टी लाऊंज आणि कॅफे सुरू केले. पराग CII यांसारख्या इंडस्ट्री प्लॅटफॉर्मवरही खूप सक्रिय होते. त्यांनी मार्केटिंग, ब्रँडिंग आणि पॅकेजिंगसाठी अनेक यशस्वी रणनीती तयार केल्या होत्या, ज्यासाठी त्यांना अहमदाबाद मॅनेजमेंट असोसिएशनने सन्मानित केले होते. पराग यांनी समूहाला नवसंजीवनी दिली आणि या नव्या युगाशी सुसंगत बनवले. यामध्ये टी लाऊंज, ई-कॉमर्स आणि डिजिटल आणि सोशल मीडिया उपक्रमांचा समावेश आहे.

Farmer leader Vijay Javandhia referenced Varhadi poet Vitthal Waghs poem in his comment in nagpur
”आम्ही मेंढर.. मेंढर..पाच वर्षाने होतो, आमचा लीलाव..’’, जावंधियांचे निवडणुकीवर भाष्य
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bipin preet singh Success Story
Success Story : आठ लाखांच्या बचतीतून सुरू केला व्यवसाय अन् उभी केली करोडोंची कंपनी
russian spy whale mystery
बहुचर्चित बेलुगा व्हेलचे रहस्य उलगडले; हा मासा खरंच रशियन गुप्तहेर होता का?
Mallikarjun kharge
Acharya Pramod Krishnam : “खरे हिंदू…”, मल्लिकार्जुन खरगेंवर काँग्रेसच्या माजी नेत्याचीच टीका!
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला

हेही वाचाः ‘वाघ बकरी टी’ समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे ४९व्या वर्षी निधन; भटक्या कुत्र्यांनी केला होता हल्ला

१८९२ मध्ये उद्योगाला सुरुवात झाली

१८९२ मध्ये नारनदास देसाई नावाचे उद्योजक दक्षिण आफ्रिकेत गेले अन् ५०० एकर चहाच्या बागांचे मालक झाले. तिथे त्यांचा संपर्क महात्मा गांधीशी आला. नारनदास देसाई यांनी दक्षिण आफ्रिकेत चहाची लागवड, प्रयोग, चाचणी इत्यादीसाठी २० वर्षे घालवली. त्यावेळी दक्षिण आफ्रिकाही भारताप्रमाणेच ब्रिटिशांच्या ताब्यात होता. नारनदास यांनी व्यवसायाचे नियम तसेच दक्षिण आफ्रिकेतील चहाची लागवड आणि उत्पादनाची गुंतागुंत जाणून घेतली. पण दक्षिण आफ्रिकेत नारनदास देसाई वांशिक भेदभावाचे बळी ठरले. सुरुवातीला ते या सगळ्याचा विरोध करत राहिले, पण वांशिक भेदभावाच्या घटना वाढत गेल्याने नारनदास यांना दक्षिण आफ्रिका सोडून भारतात परतावे लागले. १९१५ मध्ये काही मौल्यवान वस्तू घेऊन ते भारतात परतले. दक्षिण आफ्रिकेतील सर्वात प्रामाणिक आणि अनुभवी चहाच्या मळ्यांचे मालक म्हणून महात्मा गांधींनी त्यांना प्रमाणपत्र देखील बहाल केले होते. भारतात परतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील चहा व्यवसायाचा अनुभव आणि ज्ञान घेऊन नारनदासांनी गुजरातमधील अहमदाबादमध्ये १९१९ साली चहा डेपोची स्थापना केली. त्यांच्या चहाचे नाव प्रसिद्धीच्या झोतात येण्यास दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागला. पण नंतर त्यांच्या या व्यवसायाला गती मिळाली आणि काही वर्षांतच ते गुजरातमधील सर्वात मोठा चहा उत्पादक बनले.

हेही वाचाः Money Mantra : लग्नासाठी पीएफचे पैसे काढण्याचे नियम काय? ईपीएफ अ‍ॅडव्हान्स कसा काढायचा?

वाघ बकरी चहाच्या लोगोचा अर्थ काय?

वाघ बकरी चहाचा लोगो एकता आणि सौहार्दाचे प्रतीक आहे. या लोगोमध्ये दिसणारा वाघ हा वरच्या वर्गाचे तर शेळी खालच्या वर्गाचे प्रतीक आहे. लोगोमध्ये दोघांना एकत्र चहा पिताना दाखवणे हा एक मोठा सामाजिक संदेश आहे. १९३४ मध्ये ‘गुजरात टी डेपो’ने या लोगोसह ‘वाघ बकरी चहा’ ब्रँड सुरू केला. १९८० पर्यंत गुजरात चहा डेपोने ७ रिटेल आऊटलेटद्वारे मोठ्या प्रमाणात आणि किरकोळमध्ये चहाची विक्री सुरू ठेवली. पॅकेज केलेल्या चहाची गरज ओळखणारा हा पहिला ग्रुप होता. म्हणून समूहाने १९८० मध्ये गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेड लाँच केले. २००३ पर्यंत वाघ बकरी टी ब्रँड गुजरातमधील सर्वात मोठा चहा ब्रँड बनला होता. वाघ बकरी समूहाच्या उत्पादन सुविधांमध्ये दररोज दोन लाख किलो चहा आणि वार्षिक पाच कोटी किलो चहाचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. वाघ बकरीचा चहा देशातच नाही तर परदेशातही विकला जातो. कंपनीच्या विक्रीपैकी ९० टक्के टियर २ आणि टियर ३ शहरांमधून येतात. वाघ बकरी टी लाऊंजही देशभरात उघडले आहेत. वाघ बकरी चहामध्ये ३० लाऊंज आणि कॅफे आहेत. वाघ बकरी चहा समूह आज वाघ बकरी, गुड मॉर्निंग, मिली आणि नवचेतन ब्रँड अंतर्गत विविध प्रकारच्या चहाची विक्री करतो. कंपनी आइस्ड टी, ग्रीन टी, ऑरगॅनिक टी, दार्जिलिंग टी, टी बॅग्ज, फ्लेवर्ड टी बॅग्ज आणि इन्स्टंट प्रिमिक्स टीदेखील विकते.