niranjan hiranandani success story : अब्जाधीशांच्या आलिशान जगण्याबद्दल तुम्ही अनेक कथा ऐकल्या असतील. कोट्यवधींची संपत्ती असलेल्या श्रीमंत लोकांकडे महागडी खासगी जेट आणि जगातील सर्वात महागड्या गाड्यांचा ताफा असणे ही सामान्यबाब आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला एका अब्जाधीशाची कहाणी सांगत आहोत, ज्याच्‍याकडे हजारो कोटींची संपत्ती आहे, पण तरीही ते मुंबई लोकलने ऑफिसला जाताना दिसतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

ही गोष्ट आहे रिअल इस्टेट क्षेत्रातील नामवंत बिझनेस टायकून निरंजन हिरानंदानी यांची. हिरानंदानी ग्रुपचे सह संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये ते मुंबई लोकलमधून प्रवास करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ त्यावेळचा असल्याचे सांगितले जात आहे, जेव्हा हिरानंदानी मुंबई लोकलने उल्हासनगर येथील त्यांच्या कार्यालयात जात होते.

हेही वाचाः नवीन वर्षात चांगली बातमी, एलपीजी सिलिंडरच्या किमती घसरल्या, किती स्वस्त झाला?

पहिला व्यवसाय मुंबईतील कांदिवली येथे सुरू केला

मुंबईत जन्मलेले निरंजन हिरानंदानी आणि त्यांचे कुटुंब सिंधी आहेत. लखुमल हिरानंद हिरानंदानी हे त्यांचे वडील ईएनटी सर्जन आणि भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार प्राप्तकर्ते होते. निरंजन हिरानंदानी यांना नवीन आणि सुरेंद्र असे दोन भाऊ आहेत. निरंजन हिरानंदानी यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात लेखा परीक्षक म्हणून केली. त्यांनी त्यांचा पहिला व्यवसाय मुंबईतील कांदिवली येथे सुरू केला आणि १९८१ मध्ये तिथे कापड विणण्याचे युनिट उघडले. त्यांचा भाऊ सुरेंद्र यांच्या मदतीने निरंजन हिरानंदानी यांनी १९८५ मध्ये पवई येथे २५० एकर जमीन खरेदी केली. हिरानंदानी गार्डन्स या नावाने त्यांनी रिअल इस्टेटचा व्यवसाय सुरू केला.

हेही वाचाः Money Mantra : नवीन वर्षाची पहिली तारीख, आजपासून हे ७ मोठे बदल, तुम्हाला काय फायदा?

हिरानंदानी हे योट्टा इन्फ्रास्ट्रक्चरचे संस्थापक आणि अध्यक्ष

कंपनीकडे हिरानंदानी कन्स्ट्रक्शन्स, हिरानंदानी इस्टेट आणि हिरानंदानी हॉस्पिटल देखील आहे, जे २००६ मध्ये उघडले गेले. निरंजन हिरानंदानी हे योट्टा इन्फ्रास्ट्रक्चरचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. कंपनीने नवी मुंबई येथील एकात्मिक योट्टा डेटा सेंटर पार्कमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचे NM1 हे डेटा सेंटर सुरू केले. बिझनेस टायकून कमल हिरानंदानी यांच्याशी त्यांनी लग्न केले आहे. त्यांना दोन मुले आहेत, एक मुलगी प्रिया आणि मुलगा दर्शन अशी त्यांची नावे आहेत. प्रियाचे लग्न लंडनस्थित सायरस वांद्रेवाला नावाच्या व्यावसायिकाशी झाले आहे. दर्शनचे लग्न दिल्लीस्थित उद्योगपती प्रदीप झलानी आणि शबनम झलानी यांची मुलगी नेहा झलानीशी झाले आहे.

हिरानंदानी यांची निव्वळ संपत्ती किती?

हिरानंदानी यांना मुंबईची लोकलमधून अशा प्रकारे प्रवास करताना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हिरानंदानीबद्दल बोलायचे झाल्यास त्यांची गणना देशातील अव्वल श्रीमंतांमध्ये केली जाते. २०२३ च्या हुरुन यादीनुसार, निरंजन हिरानंदानी हे भारतातील ५० सर्वात श्रीमंत लोकांमध्ये येतात. त्यांची एकूण संपत्ती ३२ हजार कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्‍यांच्‍याकडे आलिशान कारचे कलेक्‍शनही आहे.

मुंबई लोकलमधून प्रवास करण्याचे कारण काय?

एखाद्या व्यक्तीकडे हजारो कोटी रुपयांची अफाट संपत्ती असेल, महागड्या गाड्यांचा अप्रतिम कलेक्शन असेल आणि तरीही ऑफिसला जाण्यासाठी मुंबईची लोकलमधून प्रवास करीत असेल, तर लोकांना आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. हिरानंदानी यांच्या प्रवासाचे कारण म्हणजे मुंबईतील वाहतूक कोंडी आहे. अनेक वेळा रस्त्यावर अडकून तासन तास वाया गेल्याने मुंबईची वाहतूक बदनाम झाली आहे. अशा स्थितीत हिरानंदानी यांनी वेळ वाचवण्यासाठी मुंबई लोकलने प्रवास करणे पसंत केले.

हिरानंदानी यांनी त्यांचा अनुभव सांगितला

स्वतः हिरानंदानी यांनी त्यांच्या अनोख्या प्रवासाची झलक शेअर केली. इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करताना त्यांनी हा अनुभव अभ्यासपूर्ण असल्याचे सांगितले. व्हिडीओबरोबरच ते लिहितात, वेळेची बचत करत आणि ट्रॅफिक टाळण्यासाठी मुंबई ते उल्हासनगर हा शहराच्या लाइफलाइनवरून एसी कोचमध्ये प्रवास करणे हा एक अभ्यासपूर्ण वैयक्तिक अनुभव होता. मुंबईची बदनामी टाळण्यासाठी लाखो लोक दरवर्षी मुंबई लोकलने त्यांच्या कार्यालयात जातात. याच कारणामुळे मुंबई लोकलला देशाच्या आर्थिक राजधानीची जीवनवाहिनीही म्हटले जाते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wealth of more than 32 thousand crores business tycoons of mumbai go to office by local train who is niranjan hiranandani vrd