जगभरातील श्रीमंतांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. न्यूयॉर्कने २०२३ मध्ये पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत शहर होण्याचा मान मिळवला आहे. ग्लोबल वेल्थ ट्रॅकर हेन्ली अँड पार्टनर्सच्या मते, शहरात ३,४०,००० करोडपती आहेत. न्यूयॉर्कनंतर टोकियो आणि सॅन फ्रान्सिस्कोच्या बे एरियात अनुक्रमे २९०,३०० आणि २८५,००० करोडपती राहतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीमंत शहरांच्या यादीत अमेरिकेतील पहिल्या चार शहरांचा समावेश

जगातील सर्वात श्रीमंत शहरांच्या अहवालात २०२३ मध्ये जगभरातील नऊ विभागां(आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, सीआयएस, पूर्व आशिया, युरोप, मध्य पूर्व, उत्तर अमेरिका, दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया) मधील ९७ शहरांचा समावेश आहे. यात जगातील सगळ्याच संपत्ती केंद्रांचा समावेश आहे. या यादीत अमेरिकेचे वर्चस्व असून न्यूयॉर्क, द बे एरिया, लॉस एंजेलिस आणि शिकागो या चार शहरांनी यादीत स्थान पटकावले आहे. यामध्ये चीनमधील बीजिंग आणि शांघाय या दोन शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचाः भारतीय बिझनेस मॉडेलने नेटफ्लिक्सची कार्यपद्धतीच बदलली, ११६ देशांमध्ये सबस्क्रिप्शन प्लॅनच्या किमती केल्या कमी

श्रीमंत शहरांच्या यादीत लंडन चौथ्या क्रमांकावर

२५८,००० करोडपतींसह उच्च निव्वळ संपत्ती असलेल्या व्यक्तींच्या यंदाच्या यादीत लंडन चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर २,४०,१०० करोडपतींसह सिंगापूरचा क्रमांक लागतो. २००० मध्ये लंडन हे करोडपतींच्या संख्येच्या बाबतीत जगातील पहिल्या क्रमांकाचे शहर होते, परंतु गेल्या २० वर्षांत ते यादीत खाली घसरले आहे. विशेष म्हणजे या श्रीमंत शहरांच्या यादीत भारतातील पाच शहरांचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, कोलकाता आणि हैदराबाद ही भारतातील सर्वाधिक श्रीमंत शहरं असल्याचं यादीत नमूद करण्यात आलं आहे.

हेही वाचाः ITR Filling: तुम्हाला ITR भरण्याचे फायदे माहीत आहेत का? कर्जापासून ते परताव्यापर्यंत अनेक लाभ

या यादीत ५ भारतीय शहरे आहेत

  1. मुंबई- ५९,४०० करोडपती
  2. दिल्ली- ३०,२०० करोडपती
  3. बंगळुरू- १२,६०० करोडपती
  4. कोलकाता- १२,१०० करोडपती
  5. हैदराबाद- ११,१०० करोडपती
मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wealthiest city which is the richest city in the world find out about these five cities in india vrd
Show comments