Dadasaheb Bhagat Success Story : ब्राझिलियन लेखक पाऊलो कुएलो यांचे एक वाक्य प्रसिद्ध आहे, ज्याचे मराठीत भाषांतर काहीसे असे आहे, “जर तुम्हाला काही हवे असेल, तर संपूर्ण विश्व तुम्हाला ते मिळविण्यात मदत करू लागते.” चित्रपटातही असाच संवाद तुम्ही ऐकला असेलच. महाराष्ट्रातील दादासाहेब भगत याची कथा त्याच एका वाक्याशी (dadasaheb bhagat success story) तंतोतंत जुळते. दादासाहेब भगत हे ग्राफिक डिझाईन कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी २ कोटी रुपयांची उलाढाल करत असून, यंदा ती १० कोटी रुपयांपर्यंत वाढेल, अशी आशा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दादासाहेब सांगतात की, ते महाराष्ट्रातील अतिशय मागासलेल्या भागातले आहेत. त्यांच्या घरातील सर्वजण ६ महिने ऊस तोडणीसाठी दुसऱ्या गावी जात असत. गरोदर असताना त्यांच्या आईने डोक्यावर उसाचा गठ्ठादेखील उचलला होता. बारावीपर्यंत शिकलेल्या दादासाहेबांनी वडिलांसोबत गावात विहिरी खोदल्या, त्यासाठी त्यांना १०० रुपयेही मिळाले नाहीत. त्यांनी घरांच्या भिंती बांधल्या आणि मजुरी केली. आज तेच दादासाहेब दोन कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक असून, अनेकांना रोजगार देत आहेत. बीडच्या आष्टी गावातील सांगवी पाटण गावाचा रहिवासी असलेल्या दादासाहेब भगत (dadasaheb bhagat) यांनी लॉकडाऊन काळात आपल्या गावात संपूर्ण भारतीय बनावटीचं डिझायनिंग सॉफ्टवेअर बनवलं. भारताच्या स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून दादासाहेब हे Do Graphics हे आपलं नवीन सॉफ्टवेअर बाजारात आणले.

कल्पना कशी सुचली?

दादासाहेबांनी कसे तरी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर डिप्लोमा कोर्सला प्रवेश घेतला. तेथून ४००० रुपये पगाराची टाटामध्ये नोकरी मिळवली. टाटामध्ये काम करत असताना त्यांना कोणीतरी सांगितले की, त्यांना इन्फोसिसमध्ये ९ हजार रुपये मिळतील, पण त्यांना ऑफिस बॉय म्हणून काम करावे लागेल. पैशाची गरज असल्याने दादासाहेबांनी ही नोकरी स्वीकारली. झाडू मारण्याबरोबरच तेथील स्वच्छतागृहेही साफ करावी लागली. इथे काम करत असताना त्यांना कोणीतरी सांगितले की, जर ते ग्राफिक डिझायनिंग शिकले तर त्यांना चांगले पैसे मिळू शकतात आणि त्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नाही. १० वी पर्यंत गावात शिक्षण घेतलेल्या दादासाहेबांनी नंतर ITI चं शिक्षण घेतलं. यानंतर ११ वी साठी त्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, परंतु काही कारणास्तव ते कॉलेजचं शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. यानंतर पुण्यात येऊन दादासाहेबांनी Infosys कंपनीमध्ये ऑफिसबॉय म्हणून काम करायला सुरुवात केली. इथे काम करत असताना दादासाहेबांना Animation Industry बद्दल कळलं.

कंपनीची स्थापना कशी झाली?

दादासाहेब सांगतात की, इन्फोसिसमध्ये येण्यापूर्वी त्यांनी कधी संगणकही पाहिला नव्हता. त्या व्यक्तीच्या सल्ल्याने ते ग्राफिक डिझायनिंग शिकले आणि ऑफिस बॉय म्हणून नोकरी सोडून एका ग्राफिक्स कंपनीत काम करू लागले. Infosys मध्ये वर्षभर काम केल्यानंतर दादासाहेबांनी Animation, Motion Graphics चे ऑनलाईन धडे गिरवायला सुरुवात केली. कधी आपल्या मित्रांकडून तर कधी ऑनलाईन शिक्षण घेत दादासाहेबने पुण्यात स्वतःची कंपनी सुरू केली. प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या दादासाहेबांनी अवघ्या काही महिन्यांत स्वतःच्या कंपनीचा जम बसवला. यादरम्यान मी VFX आणि मोशन ग्राफिक्स यांसारख्या इतर ग्राफिक्सशी संबंधित कामदेखील शिकून घेतले. सुमारे ३-४ वर्षे त्यांनी येथे काम केले. २०१५ च्या सुमारास त्यांचा अपघात झाला आणि त्यांना घरी बसावे लागले. मग त्यांनी त्यांच्या मित्राकडून लॅपटॉप घेतला आणि घरबसल्या टेम्प्लेट बनवून त्याची ऑनलाइन विक्री सुरू केली. त्यांच्या लक्षात आले की, काही महिन्यांनंतर त्यांना त्ंयाच्या पगारापेक्षा जास्त पैसे मिळू लागले. त्यानंतर त्यांनी स्वतःची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचे काम सुरू झाले.

बहुतेक ग्राहक परदेशी आहेत

दादासाहेबांची कंपनी ग्राफिक टेम्प्लेट्स बनवून लोकांना पुरवते. कंपनी मोशन ग्राफिक्स आणि 3D टेम्पलेट्स देखील तयार करते. त्यांचे देशातही ग्राहक आहेत, परंतु बहुतेक ग्राहक परदेशी आहेत. ते म्हणतात की, अनेक मोठ्या कंपन्या त्यांच्या उत्पादनांची रचना त्यांच्या गरजेनुसार करून घेतात. ते ग्राहकांना सानुकूलित डिझाइन्स देतात. त्यांची कंपनी कॅनव्हा मॉडेलवर काम करत असल्याचं ते सांगतात. दादासाहेबांची आज स्वतःची ऑडी आहे. त्यांची कंपनी डिझाईन टेम्प्लेट्समध्ये २५-३० लोकांचा स्टाफ आहे. २ कोटी रुपयांची ही कंपनी आहे, पण दादासाहेबांना खात्री आहे की यंदा कंपनीची उलाढाल १० कोटी रुपयांपर्यंत होईल.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wells dug in the village toilets cleaned in infosys today marathi young dadasaheb bhagat is the owner of audi and 2 crore company vrd
Show comments