वेदांता रिसोर्सेस (Vedanta Resources) आपला संपूर्ण व्यवसाय सहा भागात विभागण्याच्या तयारीत आहे. वेदांता लिमिटेडने शुक्रवारी पोलाद, तेल आणि वायू, वीज आणि स्टील या पाच प्रमुख व्यवसायांचे विलगीकरण करण्याबरोबरच त्या प्रत्येक व्यवसायासाठी स्वतंत्र कंपनी निर्माण करून ती सूचिबद्ध करण्याची घोषणा केलीय. ही घोषणा अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा कंपनीवर कर्जाचा बोजा आहे आणि रेटिंग एजन्सी तिचे रेटिंग कमी करत आहेत. कर्जाचा वाढता बोजा पाहता मूडीजने आपले रेटिंग सीएए १ वरून सीएए २ पर्यंत कमी केले आहे. वेदांताबाबत रेटिंग एजन्सीची भावना नकारात्मक राहिली आहे. त्यावर सुमारे ६०० कोटी डॉलर्सचे प्रचंड कर्ज आहे आणि त्यातील सुमारे दोन तृतीयांश कर्जाची पुढील वर्षी मुदतपूर्ती आहे म्हणजेच ते फेडायचे आहे. वेदांताला भेडसावणारी आणखी एक समस्या अशी आहे की, यावेळी व्याजदर वाढले आहेत, त्यामुळे पैसे उभे करणे देखील महाग झाले आहे. अशा परिस्थितीत व्यवसायाचे सहा भाग करून काय फायदा होणार, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा