म्युच्युअल फंड हा शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. प्रत्येक म्युच्युअल फंडासह गुंतवणूकदारांना अपफ्रंट कमिशन आणि एक्झिट लोड कमिशन द्यावे लागते. हे शुल्क गुंतवणूकदाराने गुंतवलेल्या रकमेतून थेट कापले जाते.

अपफ्रंट कमिशन म्हणजे काय? (What is upfront commission)

अपफ्रंट कमिशन हे एक प्रकारचे शुल्क आहे, जे गुंतवणूकदाराकडून कोणत्याही म्युच्युअल फंडात पैसे जमा केल्यावर दिले जाते. हे सामान्यतः भारतात एंट्री लोड म्हणूनदेखील ओळखले जाते आणि एजंटला पैसे दिले जातात. बाजार नियामक सेबीने ऑगस्ट २००९ पासून एंट्री लोड काढून टाकला होता. तेव्हापासून भारतीय म्युच्युअल फंड अपफ्रंट कमिशन आकारत नाहीत.

Flipkart Cancellation Fee Rule Charges
Flipkart Cancellation Fee : ऑनलाइन ऑर्डर रद्द करताच पैसे द्यावे लागणार? फ्लिपकार्टचा ‘हा’ नियम जुना, वाचा कंपनी काय म्हणते
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
Dombivli tax arrears people, Dombivli property seal,
डोंबिवलीत मालमत्ता कर थकबाकीदारांच्या गाळ्यांना टाळे
15 crores governor post marathi news
१५ कोटी द्या, राज्यपाल करतो…तामिळनाडूतील एकाची कोट्यवधी रुपयांना फसवणूक
Four lakhs cash was stolen, hotel, Kalyaninagar area,
कल्याणीनगर भागातील हॉटेलमधून चार लाखांची रोकड चोरीला
pune builder punishment
पुणे : धनादेश न वटल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकास शिक्षा, सहा महिने कारावास आणि वीस लाख रुपयांचा दंड

हेही वाचाः Money Mantra: ‘या’ सरकारी योजनेत २५ लाखांच्या ठेवींवर ११ लाखांपेक्षा जास्त व्याज मिळणार अन् FD पेक्षा जास्त परतावा

एक्झिट लोड म्हणजे काय? (What is Exit Load)

एक्झिट लोड हे शुल्क किंवा कमिशन आहे, जे एएमसी म्हणजेच म्युच्युअल फंड कंपनीद्वारे गुंतवणूकदारांकडून आकारले जाते. जेव्हा गुंतवणूकदार मुदतीपूर्वी पैसे काढतात, तेव्हाच हे शुल्क आकारले जाते. प्रत्येक म्युच्युअल फंडावर एक्झिट लोड लागू होत नाही. हे गुंतवणूकदारांकडून फक्त त्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये घेतले जाते, जिथे पैसे केव्हाही काढण्याची सुविधा असते. म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्याच्या एक वर्षानंतर गुंतवणूकदारांकडून एक्झिट लोड कमिशन आकारले जात नाही.

हेही वाचाः एका बँकेकडून ग्राहकांना दिलासा अन् दुसऱ्या बँकेने EMIचा भार वाढवला; ‘या’ दोन बँकांनी बदलला MCLR दर

एक्झिट लोडची गणना कशी केली जाते?

कोणत्याही म्युच्युअल फंडाच्या वतीने एक्झिट लोड हा त्या फंडाच्या NAV च्या आधारे ठरवला जातो. म्युच्युअल फंडातून काढलेल्या रकमेवर आधारित त्याची गणना केली जाते. उदाहरणार्थ, जर तुम्ही म्युच्युअल फंडात २,००,००० रुपये जमा केले असतील. त्याचा एक्झिट लोड एक टक्का आहे. या फंडाची सध्याची एनएव्ही १०० रुपये आहे, त्यामुळे तुम्हाला या फंडाचे २००० युनिट्स मिळतील. तुम्ही बाहेर पडता तेव्हा फंडाची NAV ११० असेल असे गृहीत धरू. अशा प्रकारे तुमच्या युनिटची किंमत (२०००*११०) २,२०,००० झाली आहे. या प्रकरणात एक टक्के एक्झिट लोडमुळे २,२०,००० पैकी एक टक्के म्हणजेच २,२०० रुपये एक्झिट लोड म्हणून भरावे लागतील. तुम्हाला २,१७,८०० रुपये मिळतील.

Story img Loader