गेल्या अनेक दिवसांपासून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची ग्राहक वाट पाहत होते आणि आज म्हणजेच २८ ऑगस्ट २०२३ रोजी तो दिवस आला आहे. आज रिलायन्सने भविष्यासाठी आपली व्यावसायिक ब्लूप्रिंट सगळ्यांसमोर ठेवणे अपेक्षित आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड (JFSL)ला आरआयएलपासून वेगळे केल्यानंतर फ्युचर रिटेल आयपीओ आणि रिलायन्स जिओ आयपीओबाबत बाजाराला काही ठोस घोषणेची अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते, योग्य किमतीत 5G डिव्हाइस लॉन्च करणे अपेक्षित आहे. Reliance AGM 2023 मध्ये Jio Financial Services Limited च्या मूलभूत गोष्टींबद्दल काही माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात?
रिलायन्स एजीएम 2023 च्या अपेक्षित परिणामांवर बोलताना एंजेल वनचे मुख्य सल्लागार अमर देव सिंग मीडिया रिपोर्टमध्ये म्हणाले की, बाजार आणि गुंतवणूकदारांनी कंपनीला आपले म्हणणे मांडण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून रिलायन्सच्या एजीएमकडे पाहिले आहे. त्यांची भविष्यातील रणनीती बघत असल्याचे काहीसे यावेळी पाहायला मिळणार आहे.
गुंतवणूकदार रिलायन्स रिटेल बिझनेस IPO ची अंतिम मुदत, डिजिटल उपक्रमांबद्दल अपडेट, कंपनीच्या स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांची प्रगती आणि ४६ व्या एजीएममध्ये Jio Financial वर अपडेटची वाट बघत आहेत. एंजल वनचे तज्ज्ञ पुढे म्हणाले की, बाजार परवडणाऱ्या 5G उपकरणांच्या लॉन्चवर तसेच आकर्षक 5G टॅरिफ पर्यायांवर लक्ष ठेवून आहे. व्हॅल्यू अनलॉकिंगच्या संदर्भात काही मजबूत आणि ठोस घोषणेची अपेक्षेवर बोलताना SMC ग्लोबल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष सौरभ जैन म्हणाले की, Jio Financial Services Limited चे डिमर्जर झाल्यानंतर बाजाराला फ्युचर रिटेल IPO आणि Reliance Jio IPO यांसारख्या आणखी काही व्हॅल्यू अनलॉकिंग टप्प्यांची अपेक्षा आहे.
हेही वाचाः विश्लेषण: दिवाळीपर्यंत सोने ६२००० रुपयांवर जाण्याची शक्यता, सोन्याच्या दरवाढीची कारणे काय?
कोणतीही ठोस घोषणा न झाल्यास RIL AGM 2023 देखील या दोन IPO च्या संभाव्य लॉन्चचे संकेत देणार आहे, अशी अपेक्षा आहे. याशिवाय JFSL शेअर लिस्टिंगनंतर Jio Financial Services बद्दल काही ठोस माहिती देखील बाजाराच्या रडारवर आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची एजीएम सोमवारी म्हणजेच आज २८ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी २ वाजता होणार आहे.
रिलायन्स एजीएम २०२३ कडून ‘या’ पाच अपेक्षा आहेत
- यावेळी गुंतवणूकदारांना रिलायन्स रिटेलचा आयपीओ आरआयएलच्या एजीएममधून अपेक्षित आहे. तज्ज्ञांना विश्वास आहे की, कंपनी त्याची तारीख जाहीर करू शकते.
- रिलायन्स जिओचा IPO देखील जाहीर केला जाऊ शकतो, गुंतवणूकदार बर्याच दिवसांपासून त्याच्या IPO ची वाट पाहत आहेत.
- रिलायन्सच्या एजीएममध्ये गुंतवणूकदारांना जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसबद्दल अधिक माहितीची अपेक्षा आहे, जेणेकरून समूहाचे भविष्यातील नियोजन काय आहे हे समजेल.
- वाजवी किमतीत 5G उपकरणे लॉन्च करण्यावर गुंतवणूकदार आणि लोकांनी लक्ष ठेवणे अपेक्षित आहे. याबरोबरच कंपनी येत्या काही दिवसांसाठी फोनबाबत काय घोषणा करते हेही लक्षात ठेवले जाईल.
- 5G च्या दराबाबत कंपनीच्या वतीने घोषणा देखील केली जाऊ शकते. रिलायन्स 5G च्या टॅरिफबाबत मोठी घोषणा करू शकते, अशी आशा सर्वसामान्यांना आहे.