RBI Governor Reaction on 2000 Rupees Notes: २००० रुपयांची नोट वितरणातून बंद केल्यानंतर आता आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरबीआयचा २००० रुपयांची नोट आणण्याचा उद्देश पूर्ण झाला आहे. २००० रुपयांच्या नोटा बदलून त्या जमा केल्या जातील, यासाठी चांगली प्रणाली कार्यरत आहे. जेणेकरून सामान्य लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. यासाठी बँकांना पूर्णपणे तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते. एका पत्रकारानं ३० सप्टेंबरनंतर नोटेचे काय होणार असे विचारले असता ते म्हणाले, ३० सप्टेंबरनंतर २००० रुपयांच्या नोटा कायदेशीर राहणार नाहीत, असे आम्ही काहीही म्हटलेले नाही.

नोटाबंदीनंतर काढलेल्या नोटांची भरपाई करण्यासाठी २००० रुपयांच्या नोटा बाजारात आणल्या गेल्या. आता बाजारात अधिक मूल्यांच्या नोटांची कमतरता नसल्याने त्या वितरणातून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २००० रुपयांची नोट कायदेशीर निविदा राहील आणि ती ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बँकांमध्ये सहजपणे जमा केली जाईल आणि बदलली जाऊ शकते.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sadhguru disheartened over Parliament disruptions on adani issue
Sadhguru on Adani: ‘उद्योगपतींवरून संसदेत रणकंदन नको’, अदाणींना समर्थन देत सद्गुरुंनी व्यक्त केली नाराजी
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे
Eknath Shinde
Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण

आरबीआय गव्हर्नरची पहिली प्रतिक्रिया

मुंबईत RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी २००० रुपयांच्या नोटा वितरणातून बाद करण्याबाबत सांगितले की, चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून, लोक सहज नोट बदलू शकतात. तुम्ही आरामात नोट बदलून घेऊ शकता. ४ महिने ही बाब गांभीर्याने घेण्याची वेळ आहे. नोटा बदलून घेण्यासाठी भरपूर वेळ आहे. जुन्या नोटा बदलून देण्यावर घातलेल्या बंदीला अडचण मानू नका. भारताची चलन व्यवस्थापन प्रणाली अतिशय मजबूत आहे. ५०० रुपयांच्या आणखी नोटा चलनात आणण्याचा निर्णय जनतेच्या मागणीवर अवलंबून असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं आहे.

शक्तिकांत दास यांनी सांगितली मोठी गोष्ट

२००० ची नोट आणण्यामागे अनेक कारणे होती आणि धोरणांतर्गत हे पाऊल उचलण्यात आले. लोकांनी जुन्या नोटा बदलण्यावरील बंदी गांभीर्याने घेतली तर चांगले होणार आहे. मात्र, बँकांना नोटा बदलण्याचा डाटा तयार करून २००० च्या नोटांचा तपशील बँकेत ठेवावा लागेल. २००० च्या नोटा बदलण्याची सुविधा सामान्य असेल. २०००च्या नोटा बदलण्यासाठी चार महिन्यांचा अवधी देण्यात आला असून, बँकांमध्ये पूर्ण तयारी करण्यात आली आहे. लोकांनी बँकेत येण्याची घाई करू नये आणि बाजारात इतर नोटांचा तुटवडा नाही, असंही शक्तिकांत दास म्हणाले.

हेही वाचाः BSNL 4G नेटवर्क उभारण्याच्या तयारीत, TCS ला दिली १५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्तीची ऑर्डर

२०००च्या नोटा मागे घेण्याचा निर्णय हा स्वच्छ नोट धोरणाचा भाग

२०००ची नोट वितरणातून काढून घेणे स्वच्छ नोट धोरणाचा भाग आहे आणि RBI च्या चलन व्यवस्थापन प्रणालीचा भाग म्हणून विचार केला पाहिजे. नोटा बदलण्यासाठी खूप वेळ आहे, त्यामुळे लोकांनी नोटा बदलताना कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये. आरबीआय जे काही अडचणी येतील ते ऐकून घेईल, जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.

हेही वाचाः खुशखबर! क्रेडिट कार्डनेही आता UPI पेमेंट करता येणार, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Story img Loader