जगभरात मंदीच्या भीतीने मोठमोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. अलीकडे अॅमेझॉन, फेसबुक, गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांनी त्यांच्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. पण एक बॉस असा आहे, ज्याने आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यासाठी स्वतःचा पगार कमी केला आहे. सतीश मल्होत्रा ​​असे या उदारमतवादी बॉसचे नाव आहे. त्यांनी उचललेले पाऊल ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. पण हे खरोखर वास्तव आहे. बॉसने कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यासाठी स्वतःचा पगार कमी केल्याची फारच मोजकी उदाहरणे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण आहेत सतीश मल्होत्रा?

सतीश मल्होत्रा ​​हे अमेरिकन स्पेशॅलिटी रिटेल चेन कंपनी ‘द कंटेनर स्टोअर’चे सीईओ आहेत. खर्च कमी करण्यासाठी आणि कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्यासाठी त्यांनी स्वेच्छेने १० टक्के पगार कपात केली आहे. फॉर्च्युनच्या अहवालानुसार, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनकडे दाखल केलेल्या फायलिंगमध्ये कंपनीने सांगितले की, मल्होत्रा यांचा वार्षिक पगार सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ९,२५,००० अमेरिकन डॉलरवरून ८,३२,५०० डॉलरपर्यंत कमी होणार आहे.

हेही वाचाः ईपीएफओने दिला अलर्ट! बनावट कॉल आणि एसएमएसपासून राहा सावध, अशी करा तक्रार

त्यांच्या या पावलाचे सर्वत्र कौतुक होतेय

फेब्रुवारी २०२१ पासून ‘द कंटेनर स्टोअर’चे प्रमुख असलेले सतीश मल्होत्रा ​​यांनी कठीण काळात कर्मचाऱ्यांना आधार देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी मल्होत्राची एकूण भरपाई २.५७ मिलियन डॉलर होती. मात्र, मल्होत्रा ​​यांच्या या पावलानंतर कर्मचाऱ्यांची सरासरी वेतनवाढ किती असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कंपनीचा तोटा कमी करण्यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याऐवजी पगार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचाः वेदांताच्या विभाजनानं काय फरक पडणार? कंपनीचे नशीब बदलेल का?

यासह सतीश मल्होत्रा हे Apple CEO टिम कुक आणि Google CEO सुंदर पिचाई यांच्या CEO च्या यादीत सामील झाले आहेत, ज्यांनी मोठ्या प्रमाणात नोकर कपात आणि खर्चात कपात करून यंदा पगारात कपात केली आहे. यंदा जानेवारीमध्ये १२,००० कर्मचार्‍यांच्या नोकर कपातीची घोषणा केल्यानंतर केवळ १० दिवसांनंतर सीईओ सुंदर पिचाई म्हणाले होते की, वरिष्ठ उपाध्यक्ष स्तरावरील सर्व कर्मचार्‍यांच्या वार्षिक बोनसमध्ये कपात केली जाणार आहे. मात्र, किती पगार कपात होणार आणि किती काळासाठी याबाबत कोणतीही माहिती पिचाई यांनी दिलेली नव्हती.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is satish malhotra reduced his salary to increase the salary of employees vrd